Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

Sanju Samson century in IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जच्या संजू सॅमसनने वादळी शतक ठोकलंय. यंदाच्या आयपीएलमधील हे पहिलंच शतक आहे. अवघ्या ५२ चेंडूंत त्यानं हे शतक पूर्ण केलंय.
संजू सॅमसनचे तडाखेबंद शतक, यंदाच्या आयपीएल स्पर्धेतलं पहिलं शतक ठोकणारा फलंदाज
Sanju Samson century against Delhi Capitalssaam tv
Published On

टी २० वर्ल्डकपमधील अविस्मरणीय आणि तितक्याच वादळी खेळीनंतर आयपीएल २०२६ मध्ये पहिल्या तीन सामन्यांत शांत असलेल्या संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळी केली. त्याची शांत असलेली बॅट आज, शनिवारी तळपली आणि दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. अवघ्या ५२ चेंडूंत त्यानं हे शतक साकारलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिलं शतक ठोकणारा सॅमसन हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

आयपीएल २०२६ च्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर संजू सॅमसन याची बॅट काहीशी शांत होती. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांत तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज, शनिवारी झालेल्या सामन्यात त्यानं वादळी शतक झळकावलं. आयपीएल २०२६ मध्ये शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याने हे शतक अवघ्या ५२ चेंडूंमध्ये पूर्ण केलं.

संजूच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिल्ली कॅपिटल्स संघासमोर २१२ धावांचा डोंगर उभारला आहे. संजूने या खेळीत अनेक बहारदार फटके लगावले. सुरुवातीपासूनच लयीत असलेल्या संजूने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी केली. या खेळीने त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तर अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम उद्ध्वस्त केले.

संजू सॅमसनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वात मोठी खेळी करणारा विकेटकीपर ठरला आहे. याबाबतीत त्याने चेन्नईचा दिग्गज खेळाडू आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. धोनीने चेन्नई संघासाठी विकेटकीपर म्हणून सर्वाधिक ८४ धावा केल्या होत्या. आता धोनीचा हा विक्रम संजूने मोडला आहे. धोनी हा मधल्या फळीत किंवा तळाला फलंदाजीला उतरत होता. पण संजू सॅमसन हा सलामीचा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. या संघासाठी खेळताना त्यानं पहिल्याच पर्वात हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलमधील चौथं शतक

संजू सॅमसनने आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेत ४ शतके ठोकली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत शुभमन गिल आणि डेविड वॉर्नरची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी चार शतके झळकावली आहेत. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ शतके ठोकली आहेत. तर जोस बटलरने सात शतके झळकावली आहेत. तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेल याने सहा, तर केएल राहुल याने पाच शतके केली आहेत.

संजू सॅमसनचे तडाखेबंद शतक, यंदाच्या आयपीएल स्पर्धेतलं पहिलं शतक ठोकणारा फलंदाज
IPL 2026 : ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा; चॅम्पियन खेळाडू आयपीएलमधून बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com