IPL 2026 : ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा; चॅम्पियन खेळाडू आयपीएलमधून बाहेर

wanindu hasaranga ruled out ipl 2026 injury : कोलकाता नाइट रायडर्सला पराभवाचा झटका देणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला जोरदार हादरा बसला आहे. संघातील चॅम्पियन खेळाडू संपूर्ण स्पर्धेबाहेर गेला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा, हसरंगा आयपीएल बाहेर
LSG vs KKR match /Social Mediasocial media
Published On

अटीतटीच्या आणि रोमहर्षक लढतीत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला पराभवाची धूळ चारून आनंद साजरा करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघावर मोठं संकट कोसळलं आहे. श्रीलंकेचा ऑलराउंडर आणि चॅम्पियन खेळाडू वानिंदू हसरंगा हा दुखापतीमुळं आयपीएल स्पर्धेबाहेर झाला आहे. लखनऊ संघाच्या व्यवस्थापनाने ही माहिती दिली.

वानिंदू हसरंगा हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कणा समजला जात होता. हुकमी एक्का असलेल्या वानिंदूला फेब्रुवारीत दुखापत झाली होती. तो यातून पूर्णपणे सावरला नव्हता. वानिंदू पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने आयपीएलमधून बाहेर झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ पुढील २४ ते ४८ तासांत वानिंदूची जागा घेणाऱ्या पर्यायी खेळाडूची घोषणा करू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्सचे टॉम मूडी यांनी केकेआरविरुद्ध सामना सुरू असतानाच, जियोस्टारला सांगितले की, वानिंदू हसरंगा आता संघात सहभागी होऊ शकणार नाही. आम्ही पुढील २४ ते ४८ तासांत त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी देण्याचा विचार करत आहोत. तत्पूर्वी, हसरंगा हा जवळपास दोन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्याला टी २० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान श्रीलंकेसाठी खेळताना पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती.

मीडिया वृत्तानुसार, हसरंगा हा गोलंदाजी करण्यास असमर्थ आहे, असे सांगण्यात येत आहे. हसरंगाला लखनऊ सुपर जायंट्सने २ कोटी रुपये मोजून खरेदी केला होता. मात्र, दुखापतीमुळे तो संघात सहभागी झाला नव्हता. हसरंगा हा मागील पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. त्याआधी २०२१ ते २०२३ पर्यंत तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत होता.

लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा, हसरंगा आयपीएल बाहेर
IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

आनंद फार काळ टिकला नाही....

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध लखनऊने मिळवलेल्या विजयाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आयपीएलच्या सर्वात उत्कंठावर्धक सामन्यात लखनऊने कोलकाताला पराभूत केलं होतं. कोलकाताने चार विकेटच्या बदल्यात १८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनऊने अखेरच्या षटकात विजयश्री खेचून आणली. मुकुल चौधरी हा खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर आयुष बदोनी यानं ३४ चेंडूत ५४ धावांचं बहुमुल्य योगदान दिलं.

लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा, हसरंगा आयपीएल बाहेर
IPL 2026: लखनौच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ; CSK तळाशी, मुंबई कितव्या स्थानावर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com