विराट कोहलीवर बंदी घातली जाणार? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावेळी घडली मोठी चूक

Virat Kohali : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ सामन्यादरम्यान रागाच्या भरात हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकल्यामुळे विराट कोहली अडचणीत येऊ शकतो. बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करू शकते.
Virat Kohali :
Virat Kohli shows frustration after dismissal, throwing helmet and gloves during IPL 2026 clash against Mumbai Indians.saam tv
Published On
Summary
  • विराट कोहलीने बाद झाल्यानंतर रागाने हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकले

  • घटना कॅमेऱ्यात कैद होऊन व्हायरल झाली

  • बीसीसीआयकडून कारवाईची शक्यता

आयपीएलच्या १९ व्या हंगामातील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीनं दमदार विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान किंग कोहलीकडून एक भली मोठी चूक झाली आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात RCB ने १८ धावांनी विजय मिळवला. कोहलीने ३८ चेंडूत ५० धावांची महत्त्वाची खेळी केली. कोहलीकडून चूक झाली ती, तो बाद झाल्यानंतर.

आऊट झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूमकडे जात होता. त्यावेळी त्याचा राग अनावर झाला. मैदानाची सीमा ओलांडताना त्याने हातातील ग्लोव्हज आणि डोक्यातील हेल्मेट रागाने काढलं आणि फेकून दिलं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असून तो अडचणीत अडकू शकतो.

Virat Kohali :
BCCIकडून राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजरवर कारवाई; डगआऊटमध्ये मोबाईल वापरणं भोवलं!

बंदी घातली जाणार का? नियम काय सांगतात?

हा प्रकार Board of Control for Cricket in India च्या IPL कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन मानला जातो. अनुच्छेद २.२ नुसार मैदानावर उपकरणांचा गैरवापर करणे हा Level-1 offence मानला जातो. यात बॅट, हेल्मेट, ग्लोव्हज फेकणे, स्टंपला लाथ मारणे, मैदानावरील वस्तूंचे नुकसान करणे याचा समावेश होतो. Level-1 offence असल्यामुळे कोहलीवर बंदी घालता येणार नाही. पण १० टक्के ते २५ टक्के मॅच फी दंड म्हणून वसूल केली जाऊ शकते. यासह १ डिमेरिट पॉइंट लावला जाऊ शकतो.

Virat Kohali :
MI vs RCB: व्हिलन कोण? मुंबईने गमावला सलग तिसरा सामना; जाणून घ्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या संघ मॅनेजरने मोबाईल हाताळला होता. याप्रकरणी मॅनेजर रोमी भिंदरवर आता बीसीसीआयने कठोर कारवाई करत त्याला नोटीस बजावली आहे. ही नोटीस बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटने (एसीएसयू) बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com