

राजस्थान रॉयल्स मॅनेजरचा मोबाईल वापरताना व्हिडिओ व्हायरल
बीसीसीआयच्या ACSU कडून कारणे दाखवा नोटीस
डगआऊटमध्ये मोबाईल वापरणे नियमबाह्य
गुवाहाटी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या संघ मॅनेजरने मोबाईल हाताळला होता. त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. राजस्थान संघाचे मॅनेजर रोमी भिंदरने डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरला. आता बीसीसीआयने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना नोटीस बजावली आहे.
यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटने (एसीएसयू) त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील ४८ तासांच्या आत उत्तर द्या असे निर्देश दिलेत. नियमांनुसार संघ व्यवस्थापक मोबाईल फोन वापरू शकतात, पण याला फक्त ड्रेसिंग रूमच्या आतच परवानगी आहे. क्रिकबझच्या एका अहवालानुसार, या प्रकरणात भिंदर डगआउट परिसरात फोन वापरताना दिसले होते. हे नियमांचे उल्लंघन मानले जाऊ शकते. त्यात संघ व्यवस्थापक डगआउटच्या अगदी कडेला, खेळाडूंच्या जागेला लागून असलेल्या एका रेफ्रिजरेटरजवळ बसले होते.
PMOA (प्लेयर अॅण्ड मॅच ऑफिशियल्स एरिया) च्या सुचनांनुसार संघ व्यवस्थापक केवळ क्रिकेट कार्यांसाठी किंवा अत्यावश्यक वैयक्तिक कामांसाठी, निर्धारित क्षेत्रांमध्येच मोबाईल उपकरणे वापरू शकतात. सुरक्षा व्यवस्थापक आणि सामना अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे फोन सायलेंट मोडवर ठेवणे. केवळ आपत्कालीन परिस्थितीतच त्याचा वापर करणे आवश्यक असते.
नियमांनुसार, संघ व्यवस्थापक लॅपटॉप किंवा इतर उपकरणे केवळ सामन्याशी संबंधित प्रशासकीय किंवा लॉजिस्टिकल कामांसाठीच वापरू शकतात. वैयक्तिक वापर हा नियमांचे उल्लंघन मानले जाते. दरम्यान रोमी भिंदर नुकताच फुफ्फुसाच्या एका गंभीर आजारातून बरा झाला आहे. वृत्तानुसार त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकला नाही. त्याने हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच बीसीसीआयला आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.