MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : आयपीएल २०२६ चा २० वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. यात आरसीबी संघाने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले.
RCB players celebrate after defeating Mumbai Indians at Wankhede Stadium in IPL 2026.
RCB players celebrate after defeating Mumbai Indians at Wankhede Stadium in IPL 2026.
Published On

आयपीएलच्या १९ व्या हंगामातील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईला आपल्या घरच्या मैदानात पराभूत व्हावे लागले. आरसीबीला प्रथम फलंदाजीला आंमत्रित केल्यानंतर बेंगरुळुच्या संघाने तडाखेबाज फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून २४० धावा केल्या.

RCB players celebrate after defeating Mumbai Indians at Wankhede Stadium in IPL 2026.
नितीश राणाची अंपायरसोबत तू-तू, मैं-मैं; संतापलेल्या स्टब्सनं तावातावात फेकलं हेल्मेट, सामन्यादरम्यान चेपॉकमध्ये काय घडलं?

आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भांबेरी उडाली. निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत मुंबईचा संघ फक्त २२२ धावा करू शकला. याप्रकारे मुंबईचा संघ आपल्याच घरच्या मैदानात १८ धावांनी पराभूत झाला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा पराभव आहे. आधी दिल्ली कॅपिटल्स, नंतर राजस्थान रॉयल्स आणि आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला.

RCB players celebrate after defeating Mumbai Indians at Wankhede Stadium in IPL 2026.
IPL 2026 : हैदराबाद अन् लखनौला कोट्यवधींचा चुना; पूरन आणि क्लासेनला डच्चू मिळणार?

या पराभवामुळे मुंबई आता पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या २४१ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन हे सलामीसाठी आले. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु १९ धावांवर रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर सुयश शर्माने मुंबईच्या पहिला मोठा धक्का दिला.

आठव्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर रिकेल्टनला बाद केलं. रिकेल्टनने २२ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर त्याच ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा बाद झाला. आठ ओव्हरनंतर मुंबईची अवस्था २ बाद ८० अशी होती. यानंतर क्रुणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबई इंडिन्यसला तिसरा धक्का दिला.

सूर्याने २२ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने शानदार फटकेबाजी केली. तो मुंबईला विजय मिळवून देईल असं चाहत्यांना वाटत होतं, परंतु हार्दिकने २२चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या जोरावर ४० धावा केल्या. अखेर मुंबईचा डाव २२२ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com