Ind vs Pak: ICC ने भरला दम, पाकिस्तान अखेर वठणीवर; T20 वर्ल्डकपमध्ये भारतासोबत खेळायला दिला होकार

Pakistan agrees to play India T20 World Cup: लाहोरमधील बैठकीनंतर चर्चेनंतर अखेर पाकिस्तानने भारताविरुद्ध T20 वर्ल्ड कप २०२६ मधील सामना खेळण्यास संमती दिलीये. १५ फेब्रुवारीला कोलंबोमझ्ये होणारा हा सामना आता निश्चित झाला आहे.
ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
ICC reaction on Pakistan Boycott India Match decisionsaam tv
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १५ जानेवारी रोजी आयोजित केलाय. मात्र पाकिस्तान सरकारने हा सामना खेळणार नाही असं सांगितल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान हा सामना ठरलेल्या दिवशीच होणार आहे. कारण सोमवारी पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताविरूद्धचा सामना खेळण्याची परवानगी दिलीये.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आयसीसी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि इतर सदस्य देशांसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेची माहिती दिली. त्यानंतर सरकारने सर्व गोष्टींचा विचार करून पाकिस्तानच्या टीमला भारताविरूद्ध खेळण्याचे निर्देश दिलेत.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
T20 world cup 2026: पॅट कमिंसनंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का; वर्ल्डकपपूर्वीच हा खेळाडू बाहेर

सुरुवातीला पाकिस्तान सरकारने केलेली मनाई

पाकिस्तानने सुरुवातीला सांगितलं होतं की, सरकारच्या सल्ल्यानुसार भारताविरुद्ध सामना खेळणार नाहीत. मात्र आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बांगलादेशाचं आवाहन आणि सततच्या चर्चेतनंतर पाकिस्तान माघार घेत असल्याचं दिसून आलं.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

लाहोरच्या बैठकीनंतर घेतला निर्णय

यासंदर्भात लाहोरमध्ये एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसीने पाकिस्तानने केलेल्या बहुतेक मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यानंतर पीसीबीने बहिष्काराची भूमिकेवर शिथिलता दाखवली. त्यामुळे हा सामना खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
Ind vs Pak Match Cancel: भारत-पाकिस्तान सामना रद्द; आयोजकांकडून अधिकृत घोषणा, काय सांगितलं कारण?

भारत-पाकिस्तान सामना हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि फायदेशीर सामना मानला जातो. जर हा सामना रद्द झाला तर आयसीसी, ब्रॉडकास्टर्स आणि सर्व सदस्य बोर्डाचं मोठं नुकसान झालं असतं. आता सामना शेड्युलनुसार होत असल्याने, स्पर्धा आणि क्रिकेट इकोसिस्टमला मोठा दिलासा मिळालाय.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
IND vs PAK: पाकिस्तान सुधारणार नाही... भारतासोबत खेळण्यासाठी घातल्या नव्या अटी, वाचा नेमकं काय म्हणाले

लाहोर बैठकीत पाकिस्तानने अनेक अटी ठेवल्या होत्या. या अटींमध्ये भारतासोबत द्विपक्षीय सिरीज, ट्रायसिरीज, हँडशेक वाद आणि आयसीसीकडून वाढवलेला रेव्हेन्यू यांचा समावेश होता. आयसीसीने पाकिस्तानच्या मागण्या मान्य करण्यात नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com