IND vs PAK: पाकिस्तान सुधारणार नाही... भारतासोबत खेळण्यासाठी घातल्या नव्या अटी, वाचा नेमकं काय म्हणाले

Pakistan Placed Three Demands Before The ICC: T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा बहिष्कार संपवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (ICC) तीन महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत.
IND Vs Pak
IND Vs Pak saam tv
Published On

आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पाकिस्तानने या स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला म्हणजेच आयसीसीला लेखी स्वरूपात याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारी रोजी होण्याची अपेक्षा केली जातेय.

२०२६ च्या टी२० वर्ल्डकपमधील हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित करण्यासाठी आयसीसी पूर्ण प्रयत्न करतेय. रविवारी ८ फेब्रुवारी रोजी आयसीसी आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील उपस्थित होते.

भारताविरुद्धच्या सामन्यावर टाकलेला बहिष्कार संपवण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्याची माहिती आहे. या ३ मागण्यांमध्ये एक मागणी अशी आहे जी भारत कधीही मान्य करणार नाही असं म्हटलं जातंय.

IND Vs Pak
T20 world cup 2026: पॅट कमिंसनंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का; वर्ल्डकपपूर्वीच हा खेळाडू बाहेर

पाकिस्तानने आयसीसीसमोर ठेवल्या या ३ मागण्या

टेलिकॉम एशिया स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी भारताविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराचा निर्णय रद्द करण्यासाठी आयसीसीसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. यावेळी त्यांनी वर्ल्ड बॉडीकडून जास्त रेवेन्यू मिळावा आणि भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करावी अशी मागणी केलीये. शिवाय, त्यांनी २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवावा अशी मागणीही केलीये.

  • पहिली मागणी - पाकिस्तानला वर्ल्ड बॉडी म्हणजे आयसीसीकडून अधिक रेव्हेन्यू मिळावा.

  • दुसरी मागणी - भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू व्हावं.

  • तिसरी मागणी- २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक करावं.

IND Vs Pak
Suryakumar Yadav Video: पागल आहेस का, फिल्डींग कर...! टॉस सोडून रोहितकडे धावला सूर्या, थेट हिटमॅनला विचारला हा प्रश्न

पाकिस्तानने आयसीसीकडे केलेल्या दुसऱ्या मागणीवर भारत कधीही सहमत होणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय सिरीज २०१२ मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान गेल्या १६ वर्षांपासून फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतायत.

IND Vs Pak
टी२० वर्ल्डकपमध्ये व्हायव्होल्टेज सामना होणार, टीम इंडिया पाकिस्तान आमनेसामने येणार? महत्वाची अपडेट आली समोर

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी भारतात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारताची भूमिका आणखी कठोर झालीये. या हल्ल्यानंतर २०२५ च्या आशिया कपपासून टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणंही थांबवलंय. जरी पाकिस्तानच्या उर्वरित दोन मागण्या पूर्ण झाल्या तरी द्विपक्षीय सिरीज पुन्हा सुरू करणं अशक्य बाब मानली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com