

उद्यापासून क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी-२० च्या स्पर्धेला सुरुवात होणार चाहते देखील उत्सुक आहेत. दरम्यान २०२६ च्या टी२० वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आधीच बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा गेमचेंजर खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरणार आहे. यापूर्वी पॅट कमिंन्सच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया धक्का बसला होता. तर आता जोश हेझलवूडच्या रूपात कांगारूंना दुसरा धक्का बसला आहे.
पॅट कमिन्सनंतर जोश हेझलवूडला दुखापतीमुळे टी-२० वर्ल्डकपमधून माघार घ्यावी लागली आहे. मिचेल स्टार्कने आधीच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. अशातच आता कमिन्ससह हेझलवूडची दुखापत ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा धक्का आहे.
१२ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्पर्धेत शेफील्ड शिल्डमध्ये जोश हेझलवूडला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. तेव्हापासून तो एकही सामना खेळलेला नाही. तो अॅशेस सिरीजमध्ये खेळू शकला नव्हता. या आठवड्यात टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन टीम श्रीलंकेत आली तेव्हा हेझलवूड सिडनीमध्ये होता. कोलंबोमध्ये आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्याच्या फक्त पाच दिवस आधी सिलेक्टर टोनी डोडमेड यांनी सांगितलं की, जोश हेझलवुड या स्पर्धेपर्यंत फीट होणार नाही.
जोश हेझलवूड २०२६ च्या टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ पर्यंत फीट होईल, असं सिलेक्टर्सना वाटत होतं. मात्र त्याची दुखापत बरी व्हायला अजून काही काळ लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने हेझलवूडच्या जागी टीममध्ये कोणाचा समावेश होणार याबाबत अजून माहिती दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.