T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासोबत खेळा नाहीतर...! ICC ने पाकिस्तानला दिली शेवटची वॉर्निंग

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आयसीसीने पाकिस्तानला स्पष्ट निर्देश दिलेत की त्यांनी भारताविरुद्ध सामना खेळलाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
ICC reaction on Pakistan Boycott India Match decisionsaam tv
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध खेळू नये असे आदेश दिलेत. तर आता आयसीसीने भारताविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तानचा हा निर्णय जागतिक स्पर्धा आयोजित करण्याच्या मूलभूत भावनेच्या विरुद्ध असल्याचं म्हटलंय.

या निर्णयावर आयसीसीने पाकिस्तानला चांगलंच झापलंय. आयसीसीने म्हटलंय की, कोणत्याही जागतिक स्पर्धेत सर्व पात्र टीम्सने नियोजित वेळापत्रकानुसार समान अटींवर खेळणं अपेक्षित आहे.

आयसीसीकडून पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानच्या निर्णयानंतर आयसीसीने रविवारी एक निवेदन जारी केलंय. यामध्ये म्हटलंय की, पाकिस्तान सरकारने दिलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याचे निर्देश देणाऱ्या विधानाची आम्ही दखल घेतलीये. मात्र आम्हाला अजून पीसीबीकडून औपचारिक सूचना मिळालेली नाही. हे जागतिक क्रीडा स्पर्धेच्या मूलभूत संकल्पनेशी विसंगत आहे. याठिकाणी सर्व टीम्सना वेळापत्रकानुसार स्पर्धा खेळणं आवश्यक आहे.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
BCCI central contract: BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून A+ कॅटेगिरी करणार सस्पेंड? विराट-रोहितच्या निर्णयामुळे होणार मोठा बदल

आयसीसी स्पर्धा निष्पक्षता, स्पर्धा, सातत्य आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित असतात. यामुळे एका सामन्याला किंवा प्रतिस्पर्ध्याला दुसऱ्या सामन्यापासून दूर ठेवणं हे स्पर्धेचं पावित्र्य आणि भावनेला कमकुवत करतं, असंही आयसीसीने निवेदनात म्हटलंय.

आयसीसीने स्पष्टपणे म्हटलंय की, राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत सरकारच्या भूमिकेचा आदर केला जात असला तरी हा निर्णय जागतिक क्रिकेट आणि जगभरातील चाहत्यांच्या हिताचा नाही. आम्हाला आशा आहे की, पीसीबी या निर्णयाचा त्यांच्या देशातील क्रिकेटच्या भविष्यावर दीर्घकालीन आणि गंभीर परिणामांचा विचार करेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं आहे.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

पाकिस्तानचं होणार नुकसान

आयसीसीने पीसीबीला इशारा दिला की, अशा निर्णयांचं पाकिस्तान क्रिकेटवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. यामुळे केवळ पाकिस्तानची इमेज खराब होणार नाही तर जागतिक क्रिकेट व्यवस्थेवरही परिणाम होणार आहे.

ICC reaction on Pakistan Boycott India Match decision
मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com