Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

Yuzvendra Chahal viral photo: भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. अलीकडेच त्याचा एक फोटो व्हायरल झाला ज्यात तो तीन तरुणींमध्ये दिसत आहे.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahalsaam tv
Published On

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आलाय. डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचे पर्सनल लाईफ सतत चर्चेत आहे. धनश्री हिच्यापासून वेगळं झाल्यानंतर चहल आरजे महवशसोबत स्पॉट झाला होता. ज्यामुळे ते डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी चहल आणि महवशने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचंही समोर आलं.

अशातच चहल पुन्हा आता बिग बॉस १३ ची कंटेस्टंट शेफाली बग्गासोबत दिसला. शेफाली आणि चहलला एकत्र पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. यावेळी हे दोघं डेट करत असल्याची अफवा पसरली होती.

यावेळी लोकांनी सोशल मीडियावर एक पोस्टर पोस्ट केलंय. चहल, शेफाली, धनश्री आणि महवाश यांचा समावेश असलेलं एआय पोस्टर तयार सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यावेळी पोस्टरवर 'किस किसको प्यार करूं ३' असं लिहिलंय. मात्र खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी या पोस्टवर स्वतः चहलने कमेंट केली.

Yuzvendra Chahal
IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

AI पोस्टरवर चहलची रिएक्शन

युजवेंद्र चहलच्या डेटिंगच्या अफवांदरम्यान 'किस किसको प्यार करूं 3' चे AI पोस्टर्स व्हायरल झाले. कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं 2' सारखाच हा लव्ह ट्राएंगल असल्याचं दिसतंय. ग्राफिक डिझायनर विजय कुमार बारियाने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर केलं आणि चहलच्या नजरेतूनही ते सुटलं नाही.

Yuzvendra Chahal
Suryakumar Yadav: चौथ्या सामन्यात प्रयोग करणं पडलं भारी; सामन्यानंतर कर्णधार सूर्याने सांगितलं कुठे गमावला सामना

या पोस्टवर चहलने मजेशीर कमेंट केली असून त्याने म्हटलंय, "अजून २-३ राहिल्यात, अ‍ॅडमिन... पुढच्या वेळी चांगला रिसर्च करून या." याचा अर्थ आणखी काही नावं घेतली नसल्याचं युजवेंद्रचं म्हणणं आहे. त्याची ही कमेंट देखील सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

Yuzvendra Chahal
Team India: टीम इंडियाच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक; दारूच्या नशेत अनेक गाड्यांना ठोकल्याची माहिती

चहलने धनश्रीला दिला धोका?

धनश्री वर्माने अश्नीर ग्रोव्हरच्या 'राईज अँड फॉल' या शोमध्ये एक मोठा खुलासा केला होता. कुब्रा सैतशी बोलताना धनश्रीने म्हटलं होतं की, चहलने लग्नाच्या पहिल्या वर्षातच तिची फसवणूक केली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिला फसवणूक झाल्याचं समजलं होतं. धनश्रीच्या या वक्तव्याने सर्वच चाहते हैराण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com