Suryakumar Yadav: चौथ्या सामन्यात प्रयोग करणं पडलं भारी; सामन्यानंतर कर्णधार सूर्याने सांगितलं कुठे गमावला सामना

Team changes experiment: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा सामना भारतीय टीमसाठी निराशाजनक ठरला. या सामन्यात काही नवीन प्रयोग करण्यात आले. परंतु त्याचा परिणाम संघाचा पराभव झाला.
Team changes experiment
Team changes experimentsaam tv
Published On

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० सिरीज खेळवण्यात येतेय. बुधवारी विशाखापट्टणममध्ये या सिरीजमधील चौथा सामना खेळवण्यात आला. यामध्ये न्यूझीलंडने भारताचा ५० रन्सने पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० ओव्हर्समध्ये ७ बाद २१५ रन्स केले. दरम्यान या सामन्यानंतर टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

न्यूझीलंडने २० ओव्हर्समध्ये २१५ रन्सची खेळी केली. २१६ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंजियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने यावेळी बऱ्याच विकेट्स गमावल्या. मात्र शिवम दुबे एका बाजूने उभा होता. त्याने २३ चेंडूत ६५ रन्सची खेळी केल. तर तर रिंकू सिंगने ३० चेंडूत ३९ रन्स केले. या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करता आली नाही.

तर टीम इंडिया १८.४ ओव्हरमध्ये १६५ रन्समध्ये गारद झाली. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने चार ओव्हर्समध्ये २६ रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तो या सामन्याचा खरा हिरो ठरला.

Team changes experiment
IND vs NZ: तिसऱ्या टी-२० साठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार मोठे बदल; २ खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता

पराभवानंतर काय म्हणाला सूर्या?

पाच सामन्यांची सिरीज जिंकल्यानंतर टीम इंडिया या सामन्यात प्रयोग करून पाहिला. यामध्ये सहा खास फलंदाजांसह प्रयोग करण्यात आले. यामध्ये हार्दिक पंड्याला फलंदाज म्हणून समाविष्ट करण्यात आलं होतं. यावेळी हर्षित राणाला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. मात्र टीम इंडियाचा हा हा प्रयोग अयशस्वी झाला आणि भारताने सामना ५० रन्सने गमावला.

Team changes experiment
Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासली अभिषेक शर्माची बॅट

सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, आम्ही मुद्दाम सहा फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. आम्हाला पाच गोलंदाज हवे होते आणि आम्हाला स्वतःलाच आव्हान द्यायचं होतं. म्हणजे जर आम्ही १८० किंवा २०० रन्सचा पाठलाग करत होतो आणि दोन किंवा तीन विकेट लवकर गमावल्या तर आम्हाला परिस्थिती कशी असेल ते पहायचं होतं.

Team changes experiment
Team India: टीम इंडियाच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक; दारूच्या नशेत अनेक गाड्यांना ठोकल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com