Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासणी अभिषेक शर्माची बॅट

Abhishek Sharma bat checking: भारताचा तरुण फलंदाज अभिषेक शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाचे खेळाडू आश्चर्यचकित झाले आणि सामन्यानंतर त्यांनी अभिषेकच्या बॅटची तपासणी केली.
Abhishek Sharma bat checking
Abhishek Sharma bat checkingsaam tv
Published On

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० सिरीज सध्या खेळवली जातेय. या सिरीजमधील तिसरा सामना २५ जानेवारी रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला. या विजयासह भारताने सिरीजही आपल्या नावे केलीये.

न्यूझीलंडच्या टीमने दिलेलं १५४ रन्सचं लक्ष्य फक्त १० ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यामध्ये अभिषेक शर्माची महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २० चेंडूत ३४० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ६८ रन्सची खेळी केली. अभिषेक शर्माने त्याच्या खेळीमध्ये सात चौकार आणि पाच सिक्स लगावले. दरम्यान विजयानंतर एक अशी घटना घडली जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Abhishek Sharma bat checking
Hardik Pandya: भर मैदानात राडा! हार्दिक पंड्या-मुरली कार्तिकमध्ये जोरदार भांडणं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी तपासली बॅट

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात अभिषेकने तुफान फलंदाजी केली. सामन्यानंतर न्यूझीलंडचे ड्वेन कॉन्वे आणि जेकब डफी अभिषेक शर्माची बॅट तपासताना दिसले. या क्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावेळी अभिषेकही त्यांच्या या कृत्यावर हसताना दिसला. शर्माने फक्त १४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे भारताचे दुसरं सर्वात जलद टी-२० अर्धशतक होतं.

Abhishek Sharma bat checking
IND vs NZ: तिसऱ्या टी-२० साठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार मोठे बदल; २ खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची फलंदाजीची फारच खराब झाली. यावेळी किवींनी २० ओव्हर्समध्ये ९ बाद १५३ रन्स केले. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, रवी बिश्नोई आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. किवीजकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ४८ रन्स केले.

Abhishek Sharma bat checking
BCCI central contract: BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून A+ कॅटेगिरी करणार सस्पेंड? विराट-रोहितच्या निर्णयामुळे होणार मोठा बदल

१५४ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच बॉलवर विकेट गमावली. संजू सॅमसनला पहिल्याच बॉलवर मॅट हेन्रीने आऊट केलं. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ रन्स केल्या. इशान किशन २८ रन्स करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने नाबाद ६८ रन्सची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com