IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

Team India final match players dropped: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दुबईत होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये बदलण्याची शक्यता आहे.
IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता
Published On

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये ५ सामन्याची टी-२० सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पाचवा आणि शेवटचा सामना आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. मुळात भारताने ही T20 सिरीज पहिल्या ३ सामन्यांमध्ये जिंकलीये. आधीच पाच सामन्यांच्या T20I सिरीजमध्ये भारत 3-1 ने आघाडीवर आहे.

त्यामुळे आता तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या या पाचव्या आणि शेवटच्या T20I सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑलराऊंडर अक्षर पटेल या सामन्यात खेळणाक असल्याचं म्हटलं जातंय. कारण या सामन्यात हार्दिक पंड्याला आराम देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता
Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासली अभिषेक शर्माची बॅट

फायनल टी-२० मध्ये होणार मोठे बदल

गेल्या दोन टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेला स्पिनर गोलंदाज वरुण चक्रवर्ती विशाखापट्टणममधील चौथ्या टी-२० सामन्यापासून नेटमध्ये सातत्याने गोलंदाजी करतोय. तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तिरुवनंतपुरम टी-२० सामन्यासाठी वरुण चक्रवर्तीचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो.

दुसरीकडे दुखापतीमुळे चौथ्या टी-२० सामन्याला मुकलेला इशान किशन पाचव्या सामन्यामध्ये कमबॅक करेल असं म्हटलं जातंय. इशान किशनने सामन्यापूर्वी सराव केला. यावेळी त्याने नेट्समध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. सरावादरम्यान इशान किशन पूर्णपणे फीट असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता
Suryakumar Yadav: चौथ्या सामन्यात प्रयोग करणं पडलं भारी; सामन्यानंतर कर्णधार सूर्याने सांगितलं कुठे गमावला सामना

न्यूझीलंडच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता

दरम्यान न्यूझीलंडसाठी बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळल्यानंतर टीममध्ये फिन अॅलन सामील झाला आहे. तो डेव्हॉन कॉनवेच्या जागी टीममध्ये खेळू शकतो. इंदूरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना मायकेल ब्रेसवेलच्या डाव्या पायाच्या दुखापत झाली मुळे होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता
Virat Kohli: इंस्टावर कोहलीचं कमबॅक! का डिएक्टिव झालेलं विराटचं अकाऊंट? जाणून घ्या

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com