Suryakumar Yadav Video: पागल आहेस का, फिल्डींग कर...! टॉस सोडून रोहितकडे धावला सूर्या, थेट हिटमॅनला विचारला हा प्रश्न

Suryakumar Yadav funny incident: नुकत्याच झालेल्या सामन्यात टॉस सुरु असतानाच एक गमतीदार प्रसंग घडला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव रोहित शर्माकडे धावत गेला आणि त्याला प्रश्न विचारला.
Suryakumar Yadav Video
Suryakumar Yadav Videosaam tv
Published On

टी-२० वर्ल्डकपला कालपासून सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवलाय. रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर असल्याने वानखेडेमध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्यात तो उपस्थित होता. अशावेळी सूर्या टॉससाठी जात असताना रोहित आणि त्याची भेट झाली. यावेळी सूर्याने एक मोठा आणि महत्त्वाचा सल्ला रोहितकडून घेतल्याचं समोर आलंय.

कालच्या सामन्यात टॉससोडून सूर्या रोहितला भेटण्यासाठी धावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलं नव्हतं. मात्र रविवारी आयसीसीने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये सूर्या माजी वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहितकडून सल्ला घेत असल्याचं ऐकू येतंय.

भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील नातं बहुतेकदा विजय आणि पराभवाच्याही पलीकडे असतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत-अमेरिका सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने लाखो चाहत्यांची मनं जिंकूली. टॉस सुरू होणार असतानाच सूर्याची नजर तिथून जाणाऱ्या रोहित शर्मावर पडली. दरम्यान, सूर्याने लगेच टॉस सोडून रोहितकडे धाव घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली.

Suryakumar Yadav Video
T20 world cup 2026: पॅट कमिंसनंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का; वर्ल्डकपपूर्वीच हा खेळाडू बाहेर

सूर्या आणि रोहितमध्ये काय झाली चर्चा?

आयसीसीने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्या रोहितला म्हणतो, लवकर सांग टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी की फलंदाजी काय घेऊ? त्याच्या या प्रश्नावर रोहितही त्याला, वेडा आहेस का पहिल्यांदा फिल्डींग करण्याचा निर्णय घे असं म्हणतोय. काल हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सूर्या आणि रोहितमध्ये काय बोलणं झालं असेल असा प्रश्न चाहत्यांना होता. अखेर त्याचं उत्तर आता सापडलंय.

मात्र टीम इंडियाला टॉस जिंकता आला नाही त्यामुळे अमेरिकेच्या टीमने घेतलेल्या निर्णयानुसार भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज शॅडली व्हॅन शाल्कविकने टीम इंडियाच्या टॉप आर्डरला माघारी धाडलं.

Suryakumar Yadav Video
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या USA विरुद्ध भारताचे ५ धुरंधर फुस्स्ssss, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

वानखेडेवर सूर्याचं तुफान

इशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे सारखे स्टार खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते आणि १३ व्या ओव्हरपर्यंत भारताचा स्कोर ७७/६ होता. टीम इंडिया पहिला गमावणार असं चित्र दिसत असताना कर्णधार सूर्यकुमार टीमसाठी धावून आला. कॅप्टन्स इनिंग करत त्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ रन्सची खेळी केली.

Suryakumar Yadav Video
सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी ठरली गेमचेंजर! भारतानं अमेरिकेला नमवलं! टीम इंडियाची विजयी सलामी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com