Asia Cup 2027: एशिया कप 2027 च्या तारखा समोर, यंदा टी-20 नव्हे तर वेगळ्याच फॉरमॅटमध्ये होणार थरार!

Asia Cup Schedule: एशिया कप 2027 स्पर्धा 18 जून ते 4 जुलैदरम्यान बांग्लादेशमध्ये खेळवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये होणार असून मीरपूर, चट्टोग्राम आणि सिलहट ही संभाव्य यजमान मैदानं असतील.
Asia Cup 2027
Asia Cup 2027saam tv
Published On

आशियातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आलीये. एशिया कप 2027 स्पर्धेच्या संभाव्य तारखा निश्चित झाल्या असून ही स्पर्धा 18 जून ते 4 जुलै 2027 या कालावधीत खेळवली जाणार आहे. क्रिकबजने यासंदर्भातील माहिती दिली असून पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची तयारी लक्षात घेऊन यावेळी एशिया कप वनडे स्वरूपात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Asia Cup 2027
FIFA World Cup 2026: इजिप्त आघाडीवर, मेस्सीची पेनल्टीही हुकली; 13 मिनिटांत पालटलं चित्र, वाचा अर्जेंटिनाने कसा जिंकला हरलेला सामना?

यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशकडे आहे. स्पर्धेतील सामने मीरपूर, चट्टोग्राम आणि सिलहट या तीन मैदानांवर खेळवण्याची तयारी सुरू आहे. एशियन क्रिकेट काऊंसिलने (ACC) स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील माहिती मागवली असून अंतिम स्थळांबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार एशिया कप

यापूर्वी झालेला 2025 चा एशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता. मात्र 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप असल्यामुळे यावेळी एशिया कपही वनडे स्वरूपात होणार आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये झाली होती. यंदा मात्र शेड्यूलमध्ये बदल करत जून-जुलै महिन्यात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

Asia Cup 2027
Lionel Messi: वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करताच मेस्सीला अश्रू अनावर, सामन्यानंतर स्वतःच सांगितलं कारण

बांग्लादेश यापूर्वी 2016 मध्ये एशिया कपचं यजमानपद भूषवलं होतं. त्या स्पर्धेत यजमान टीमने अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात भारताने बांग्लादेशवर 8 विकेट्सनी विजय मिळवत विजेतेपद पटकावलं होतं.

दरम्यान, बांग्लादेश क्रिकेटमध्येही अलीकडे मोठा बदल झाला आहे. माजी कर्णधार तमीम इकबाल यांच्याकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार असल्याने या स्पर्धेकडे विशेष लक्ष लागलंय.

Asia Cup 2027
Gautam Gambhir: "अशा पराभवासाठी वेगळंच टॅलेंट लागतं!" आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली, पोस्ट व्हायरल

टीम इंडियाच्या बांग्लादेश दौऱ्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांचा मुलगा इब्राहिम यांनी दोन्ही टीमच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली जाईल, तसंच गरज भासल्यास सुरक्षा आणखी वाढवली जाईल, असं सांगितलंय. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात द्विपक्षीय मालिकेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com