FIFA World Cup 2026: इजिप्त आघाडीवर, मेस्सीची पेनल्टीही हुकली; 13 मिनिटांत पालटलं चित्र, वाचा अर्जेंटिनाने कसा जिंकला हरलेला सामना?

फिफा वर्ल्ड कप 2026 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध 0-2 पिछाडीवरून अविश्वसनीय कमबॅख करत 3-2 असा थरारक विजय मिळवला. पेनल्टी चुकवल्यानंतर लिओनेल मेसीने गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली, तर एन्झो फर्नांडेझच्या अखेरच्या क्षणातील गोलने अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला.
FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026saam tv
Published On

फिफा वर्ल्ड कप 2026 च्या राऊंड ऑफ 16 मधील अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. एका टप्प्यावर अर्जेंटिनाचा पराभव निश्चित मानला जात होता. लिओनेल मेसीचा हा अखेरचा वर्ल्ड कप सामना ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण शेवटच्या 13 मिनिटांत अर्जेंटिनाने असा खेळ केला की, हरलेला सामना जिंकून दाखवला. अर्जेंटिनाने इजिप्तवर 3-2 असा थरारक विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवलंय.

या सामन्याची सुरुवात मात्र अर्जेंटिनासाठी अत्यंत निराशाजनक झाली. फर्स्ट हाफमध्ये इजिप्तने सामन्यावर पूर्ण कंट्रोल ठेवला होता. 15व्या मिनिटाला यासिर इब्राहिमने इजिप्तसाठी पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

FIFA World Cup 2026
Gautam Gambhir: "अशा पराभवासाठी वेगळंच टॅलेंट लागतं!" आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली, पोस्ट व्हायरल

चार मिनिटांनी म्हणजेच 19व्या मिनिटाला अर्जेंटिनाला बरोबरीची मोठी संधी मिळाली. रेफ्रीने पेनल्टी दिली आणि बॉल लिओनेल मेसीच्या पायाशी आला. मात्र जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या मेसीकडून ही पेनल्टी चुकली. त्यांचा हा प्रयत्न फसल्याने स्टेडियममध्ये शांतता पसरली आणि फुटबॉलप्रेमींनाही मोठा धक्का बसला.

दुसऱ्या हाफमध्येही इजिप्तनेच वर्चस्व कायम ठेवलं. 67व्या मिनिटाला मुस्तफा जीकोने आणखी एक गोल करत इजिप्तला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. त्या क्षणी अर्जेंटिनाचा प्रवास इथेच संपणार, असंच चित्र दिसत होतं. पण त्यानंतर सामना पूर्णपणे बदलला.

79 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा पहिला गोल

79व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने अर्जेंटिनासाठी पहिला गोल करत विजयाच्या आशा जिवंत ठेवला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी 83व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. काही मिनिटांपूर्वी पेनल्टी चुकवणाऱ्या मेसीनेच पु्न्हा टीमला तारलं.

FIFA World Cup 2026
एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा; इंग्लंडविरुद्ध वनडेआधीच टीम इंडियात बदल; झिम्बाब्वे दौऱ्यात 'चॅम्पियन'ला डच्चू

90 मिनिटांचा नियमित वेळ संपल्यानंतर सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असं वाटत असतानाच अर्जेंटिनाने शेवटचा मोठा डाव टाकला. अतिरिक्त वेळेच्या 93व्या मिनिटाला एन्झो फर्नांडेझने गोल करत अर्जेंटिनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरची शिट्टी वाजली आणि अर्जेंटिनाने अविश्वसनीय कमबॅक करत सामना जिंकला.

FIFA World Cup 2026
IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

विजयानंतर मेस्सीच्या डोळ्यात आनंदाश्रू

विजयानंतर लिओनेल मेसीच्या डोळ्यांत अश्रू होते. हा फक्त एक विजय नव्हता तर कठीण परिस्थितीतही शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणाऱ्या टीमच्या जिद्दीचं उदाहरण होतं. दोन गोलांनी पिछाडीवर असतानाही अर्जेंटिनाने दाखवून दिलं की फुटबॉलमध्ये अंतिम शिट्टी वाजेपर्यंत निकाल निश्चित होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com