

मंगळवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. इंग्लंडने भारतासमोर 202 रन्सचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. एकामागोमाग एक फलंदाज स्वस्तात बाद होत गेले आणि संपूर्ण टीम अवघ्या 76 धावांत गारद झाला.
फलंदाजांसोबतच काही गोलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाच खेळाडूंची खराब कामगिरी टीमसाठी सर्वाधिक महागात पडली. इंग्लंडविरूद्धच्या या पराभवासाठी कोणते ५ खेळाडू जबाबदार ठरलेत ते पाहूयात.
मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्माकडून मोठ्या आणि जबाबदारीच्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो सुरुवातीपासूनच दबावाखाली खेळताना दिसला. त्याने 11 चेंडूंचा सामना करत केवळ 3 रन्स केले. टीमला मोठी भागीदारी हवी असताना त्याची संथ फलंदाजी महागात पडली. अखेर कोणतंही मोठं योगदान न देता तो आऊट झाला.
ओपनर ईशान किशनने सुरुवात आक्रमक केली होती. मात्र त्या त्याला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याने 9 चेंडूत 13 रन्सची खेळी केली. त्याच्या खेळीत एक चौकार आणि एक सिक्स होती. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीमला त्याच्याकडून मोठ्या खेळीची गरज होती. पण तो लवकर बाद झाल्याने उर्वरित फलंदाजांवर अतिरिक्त दबाव आला.
अक्षर पटेलला ना फलंदाजीत छाप पाडता आली ना गोलंदाजीत. गोलंदाजी करताना त्याने 4 ओव्हर्समध्ये 49 रन्स दिले आणि फक्त एक विकेट घेतली. डेथ ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याला धु-धु धुतलं. फलंदाजीतही त्याने 4 चेंडूत 10 रन्स केले.
ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीत त्याने 1 ओव्हर टाकताना 10 रन्स दिले आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. फलंदाजीतही तो केवळ 2 रन्स करून माघारी परतला. मधल्या फळीत त्याची लवकर पडलेली विकेट भारतासाठी मोठा धक्का ठरली.
कर्णधार श्रेयस अय्यरलाही टीमचा डाव सावरण्यात अपयश आलं. त्याने केवळ 4 चेंडूत 5 रन्स केले आणि तो लवकर बाद झाला. सुरुवातीचे विकेट पडल्यामुळे त्याच्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र ती पार पाडण्यात तो अपयशी ठरला. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही त्याचं योगदान टीमच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.