Gautam Gambhir: "अशा पराभवासाठी वेगळंच टॅलेंट लागतं!" आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली, पोस्ट व्हायरल

आयर्लंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताच्या पराभवानंतर आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीर यांच्यावर उपरोधिक पोस्ट करत वाद निर्माण केला. सोशल मीडियावर मीम्स आणि टीका वाढली असून टीम इंडियाच्या कोचिंग आणि रणनीतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Gautam Gambhir
Gautam GambhirBCCI (X)
Published On

आयर्लंडविरुद्धच्या टी20 सिरीजमध्ये टीम इंडियाला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स आणि टीका सुरू झालीये. या सगळ्या चर्चेत आता आइसलँड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर टीका करत नवा वाद निर्माण केलाय. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

Gautam Gambhir
ODI ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा; प्रिन्स गिलने किंग कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर?

आइसलँड क्रिकेटचा गौतम गंभीरला टोला

आयरलंडविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला अवघ्या 1 रनने पराभव पत्करावा लागल्यानंतर आइसलँड क्रिकेटने एक उपरोधिक पोस्ट केली. त्यांनी लिहिलंय की, “आम्ही स्पष्ट करतो की गौतम गंभीरला आमच्या कोचिंग स्टाफमध्ये घेण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. पण त्यांच्यात एक गोष्ट नक्कीच खास आहे. एवढ्या दर्जेदार भारतीय खेळाडूंना घेऊन आयर्लंडमध्ये येऊन अशा प्रकारचा निकाल देणं, यासाठी खरोखरच वेगळं कौशल्य लागतं.” या पोस्टमधून त्यांनी गंभीर यांच्या कोचिंगवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केलेत.

आइसलँड क्रिकेटची टीका

हे पहिल्यांदाच नाही की आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीर यांच्यावर टीका केलीये. याआधी जेव्हा भारतीय टीमला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये पराभव सहन करावा लागला होता तेव्हाही त्यांनी गंभीर यांना लक्ष्य केलं होतं. त्या वेळी त्यांनी लिहिलं होतं की, “आमच्या चाहत्यांना सांगतो की, गौतम गंभीरला आमच्या राष्ट्रीय टीमचा कोच बनवण्यासाठी आमंत्रण दिलं जाणार नाही. ती जागा आधीच भरलेली आहे आणि आम्ही 2025 मध्ये आमच्या 75% सामने जिंकले आहेत.”

Gautam Gambhir
Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

गंभीर यांच्या कोचिंगवर वाढणारे प्रश्न

जुलै 2024 मध्ये राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर यांनी भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र त्यानंतर काही सिरीजमध्ये टीमचे निकाल निराशाजनक राहिलेत. 2024 मध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 असा टेस्ट सिरीजमध्ये पराभव सहन करावा लागला. जो गेल्या 12 वर्षांतील घरच्या मैदानावरील पहिला मोठा पराभव होता.

Gautam Gambhir
IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

या वर्षाच्या सुरुवातीला देखील न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीजमध्ये भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. आता आयर्लंडसारख्या तुलनेने टीमकडून टी20 सिरीजमध्ये 0-2 असा पराभव झाल्याने गंभीर यांच्या रणनीती आणि कोचिंगवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com