

बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
यापूर्वी तो वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्त झाला होता.
स्टोक्स आणि गस एटकिनसन यांच्यातील कथित वादानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग
इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्सने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचनंतर स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. स्टोक्सने याआधीच वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे बेन स्टोक्स कोणत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाहीये.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनने विजय मिळवल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स आणि फास्ट बॉलर गस एटकिनसन नाईट क्लबमध्ये गेले होते. पण नाईट क्लबमध्ये त्यांची हाणामारी झाली होती. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्स आणि एटकिनसन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. दुसऱ्या टेस्टमधून स्टोक्स आणि एटकिनसन यांना बाहेर करण्यात आलं होतं. त्यावेळी स्टोक्स निवृत्ती घेईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान यावर्षाच्या सुरूवातीला ऍशेसमध्ये इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्याच नेतृत्वात खेळला होता, पण ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 4-1 ने पराभव झाला. तेव्हापासूनच स्टोक्सच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. नाईट क्लबमधल्या राड्यानंतर मात्र स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान यावर्षाच्या सुरूवातीला ऍशेसमध्ये इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्याच नेतृत्वात खेळला होता, पण ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 4-1 ने पराभव झाला. तेव्हापासूनच स्टोक्सच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. नाईट क्लबमधल्या राड्यानंतर मात्र स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.