Lionel Messi: वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करताच मेस्सीला अश्रू अनावर, सामन्यानंतर स्वतःच सांगितलं कारण

Surabhi Jayashree Jagdish

मेस्सीची हॅट्रिक

या सामन्यात अर्जेंटिनाने अल्जेरियाविरुद्ध जोरदार सुरुवात केली. लिओनेल मेस्सीने या सामन्यात एकूण ३ गोल करून हॅट्रिक पूर्ण केली. हा त्याचा वर्ल्डकप इतिहासातील पहिलाच हॅट्रिकचा विक्रम ठरला.

World Cup 2026 | saam tv

पहिला गोल

पहिला गोल केल्यानंतर मेस्सीला अचानक अश्रू अनावर झाले होते. सुरुवातीला चाहत्यांना त्याच्या रडण्याचं कारण समजलं नाही. नंतर मेस्सीने सांगितलं की, हे फुटबॉलशी संबंधित नव्हतं, तर वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळामुळे तो भावुक झाला होता.

Messi Hat-trick | saam tv

कठीण काळाबद्दल मेस्सीचं स्पष्टीकरण

मेस्सीने सांगितलं की, वर्ल्डकपपूर्वी त्याने काही कठीण दिवस अनुभवले होते. हे सर्व त्रास खेलाशी संबंधित नसून वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले होते. तो या काळात खूप मानसिक तणावातून गेला होता असं त्याने स्पष्ट केलं.

FIFA World Cup | saam tv

सहकारी आणि संघाचे आभार

मेस्सीने आपल्या टीमतील खेळाडूंना आणि टीम मॅनेजमेंटला धन्यवाद दिलेत. त्यांनी कठीण काळात मला मोठा आधार दिला असे तो म्हणाला. या पाठिंब्यामुळेच तो मैदानावर पुन्हा उत्तम कामगिरी करू शकला असं त्याने सांगितलंय.

International Football | saam tv

भावूक प्रतिक्रिया

सामन्यानंतर मेस्सीने सांगितलं की, ही भावना त्याच्यासाठी खूप खास होती. कठीण काळानंतर असे क्षण अनुभवणं त्याच्यासाठी मोठा आनंद होता. तो सध्या आपल्या टीमसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असल्याचं म्हणाला.

Messi Goals | saam tv

लिओनेल मेस्सी झाला भावूक

इतर ऐतिहासिक विक्रम

या सामन्यात मेस्सीने आपल्या करिअरचा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तो वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा सहभागी होणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या वयाच्या ३८ व्या वर्षी हॅट्रिक करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला.

Soccer News | saam tv

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

peanut powder acidity | saam tv
येथे क्लिक करा