Cricket: क्रिकेटचा थरार पावासातही पाहता येणार; वादळ वाऱ्यातही होतील सामने, पण कसं?

Indian National Cricket Team: भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी बीसीसीआयने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तयार केलीय.
Cricket: क्रिकेटचा थरार पावासातही पाहता येणार; वादळ वाऱ्यातही होतील सामने, पण कसं?
Indian National Cricket Teamx
Published On

बीसीसीआयने क्रिकेटमध्ये नवीन क्रांती करणार आहे. भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तयार केलीय. त्याची छायाचित्रे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शेअर केली आहेत. ही अकादमी भारतीय क्रिकेटसाठी गेम चेंजर ठरू शकते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. यासोबतच भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा भक्कम पाया रचला जाणार आहे.

BCCI चे सचिव जय शाह यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केलीय. भारतीय खेळाडूंसाठी नवीन अत्याधुनिक राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तयार होत आहे. ही अकादमी बेंगळुरू येथे असेल आणि त्यात जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. भारतीय क्रिकेट सुधारण्यासाठी बीसीसीआय सातत्याने प्रयत्न करत आहे. ही नवीन अकादमी या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.

x या सोशल मीडियाच्या साईटवर फोटो शेअर करताना जय शाहने लिहिले की, “बीसीसीआयची नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) जवळजवळ पूर्ण झालीय. लवकरच बेंगळुरूमध्ये उघडेल हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. नवीन NCA मध्ये तीन जागतिक दर्जाची क्रीडा मैदाने, ४५ सराव खेळपट्ट्या, एक इनडोअर क्रिकेट खेळपट्टी, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक प्रशिक्षण, रिकव्हरी आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील. हा उपक्रम आपल्या देशातील वर्तमान आणि भविष्यातील क्रिकेटपटूंना शक्य तितक्या चांगल्या वातावरणात त्यांची क्षमता विकसित करण्यास मदत करेल, असं जय शहा यांनी पोस्ट करून माहिती दिलीय.

अकादमीत काय विशेष असेल?

इनडोअर खेळपट्टी: या अकादमीची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे खेळाडू वादळ आणि पावसातही सराव करू शकतील. त्यासाठी अकादमीमध्ये इनडोअर खेळपट्टी बनवण्यात आलीय.

जागतिक दर्जाच्या सुविधा: अकादमीमध्ये तीन जागतिक दर्जाची क्रीडा मैदाने, ४५ खेळपट्ट्या, ऑलिम्पिक आकाराचे जलतरण तलाव, रिकव्हरी सेंटर आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील.

फिटनेसवर भर : खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले जाईल. अकादमीमध्ये आधुनिक प्रशिक्षण केंद्रही असणार आहे.

दुखापत झाल्यास विशेष व्यवस्था : कोणताही खेळाडू जखमी झाल्यास त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत

बीसीसीआयचा हा उपक्रम भारतीय क्रिकेटसाठी मोठी उपलब्धी असणार आहे. अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. भारतीय खेळाडू त्यांच्या फिटनेस आणि इतर खेळांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी येथे येतात. टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

Cricket: क्रिकेटचा थरार पावासातही पाहता येणार; वादळ वाऱ्यातही होतील सामने, पण कसं?
IPL 2025 : हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता ? रोहित-सूर्यासह या 4 जणांवर MI विश्वास दाखवण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com