वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी शनिवारी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या स्पर्धेत खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. या लिलावाच्या वेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएल २०२४ आणि वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या आयोजनाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
केव्हा होणार आयपीएल २०२४ स्पर्धेचं आयोजन?
जय शाह यांनी खुलासा करत सांगितलं आहे की, आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेची सुरुवात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात केलं जाईल. तर स्पर्धेतील फायनलचा सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाहीतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खेळवण्यात येईल. येत्या १९ डिसेंबर रोजी या स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा खेळाडूंचा लिलाव हा भारतााबाहेर होणार आहे. सर्व १० फ्रेंचायजी मिळून २६२.९५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर या स्पर्धेसाठी एकुण ७७ खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. ज्यात ३० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. (Latest sports updates)
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेला केव्हा होणार प्रारंभ?
आयपीएल स्पर्धेसह जय शाह (Jay Shah) यांनी वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेची तारीख देखील सांगितली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे की, येत्या ३ किंवा ३ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर या स्पर्धेचे आयोजन एकाच राज्यात केले जाऊ शकते.
वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन ४ ते २६ मार्च दरम्यान डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये केले गेले होते. यावेळीही या सामन्यांचे आयोजन मुंबई आणि बंगळुरुत केले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.