IND vs SA T20I Series: भारत-द.आफ्रिका सामना रद्द होताच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! मोठं कारण आलं समोर

India vs South Africa T20I Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
team-india
team-indiagoogle
Published On

Indian Cricket Team, T20 World Cup 2024:

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्याची नाणेफेकही होऊ शकलेली नाही. दरम्यान हा सामना रद्द झाल्याने भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. काय आहे यामागचं कारण?जाणून घ्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला केवळ ६ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

या ६ पैकी १ सामना पावसामुळे धुतला गेला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर (Team India) आता केवळ ५ सामने शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिका दौरा झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाची शेवटची टी-२० मालिका असणार आहे.

team-india
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरा सामना कधी?

संघ बांधणीसाठी आगामी मालिका महत्वाची..

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर असताना अजूनही भारतीय संघाची संघबांधणी झालेली नाही. टी-२० संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आहे. मात्र तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

तर रोहित शर्माला बीसीसीआयने संघाचं नेतृत्व करायला सांगितलं होतं. मात्र त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयचा नेमका प्लान काय आहे हे कळू शकलेलं नाही. (Latest sports updates)

team-india
PKL 2023: नवीनचं सुपर १० व्यर्थ! शेवटच्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीच्या तोंडचा घास हिसकावला

२०२२ मध्ये झाला होता पराभव...

भारतीय संघाने २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही दमदार खेळ केला होता.मात्र सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. नुकताच संपन्न झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com