IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरा सामना कधी?

India vs South Africa 1st T20I : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
IND vs SA:
IND vs SA: Twitter
Published On

India vs South Africa 1st T20I :

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे न बॅटिंग, न बॉलिंग करता सामन्याचा निकाल जाहीर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे-सातच्या सुमारास सुरु होणार होता. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आता या टी-२० मालिकेचा दुसरा सामना १२ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

पाऊस आल्याने सामन्याचा टॉसही झाला नाही. तीन सामन्यांची टी-२० मालिकेत आता पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. आता पुढील दोन १२ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IND vs SA:
IND vs Pak: अजानची झुंझार शतकी खेळी, U-19 आशिया चषकात पाकिस्तानकडून भारताच्या यंगीस्थानचा दणदणीत पराभव

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या टी-२० सामन्यात पावसाने बाजी मारली आहे. या पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत होता. पावसामुळे सामन्याचे षटकही कमी करण्याचे ठरविले होते. मात्र, पाऊस सुरुच राहिल्याने भारतीय वेळेनुसार रात्री ९.२५ वाजता सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.

IND vs SA:
Virat Kohli Nickname: विराट कोहलीला चिकू हे नाव कसं पडलं? वाचा मजेशीर किस्सा

वर्ल्डकपआधी टीम इंडिया किती सामने खेळणार?

तत्पूर्वी, ३ जून ते ३० जून, २०२४ दरम्यान होणारा टी-२० वर्ल्डकप हा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यात आजचा सामना रद्द झाल्याने आता टीम इंडिया फक्त ५ टी-२० सामना खेळणार आहे. तर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात फक्त २ टी-२० सामने खेळणार आहेत.

या दौऱ्यानंतर भारतात अफिगाणिस्तविरुद्ध तीन सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेनंतर संघ वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर टीम इंडियाने २००७ साली पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com