IND vs SL : टीम इंडिया खास शतक ठोकणार, श्रीलंकेत चालणार मियां मॅजिक, फलंदाजीत विराटच किंग!

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आजपासून तीन सामन्याच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.
IND Vs SL श्रीलंकेत चालणार मियां मॅजिक, फलंदाजीत विराटच किंग!
IND Vs SL odiSaam Tv
Published On

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाने तीन सामन्याच्या टी२० मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेचा (IND vs SL) धुव्वा उडवला. त्यानंतर आता रोहित शर्मा अॅण्ड कंपनी श्रीलंकेचा सुपडासाफ करण्यासाठी मैदानात (IND vs SL ODI)उतरणार आहेत. टी२० मालिकेतून निवृत्ती घेतल्यानंतल विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच वनडे सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (champions trophy 2025) तयारीसाठी ही मालिका महत्वाची आहे. त्यामुळेच भारतीय संघ पूर्ण ताकदीने उतरला आहे. त्याशिवाय युवा खेळाड़ूंनाही संधी देण्यात आली आहे.

आजपासून (२ ऑगस्ट) भारत आणि श्रीलंका या संघामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेला (IND Vs SL ODI) सुरुवात होणार आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेचा धुव्वा उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याशिवाय केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचेही वनडेमध्ये कमबॅक झालेय. टी२० मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही एकतर्फी वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. टीम इंडिया श्रीलंकेचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंकेत विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांची कामगिरी सरस राहिली आहे. त्यांच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांचं लक्ष असेल.

विराट कोहली श्रीलंकेत किंग -

श्रीलंकेच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. धोनीने ३१ सामन्यात ४९ च्या सरासरीने १०२८ धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्याच्या टीम इंडियातील खेळाडूमध्ये श्रीलंकेविरोधात श्रीलंकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने (Virat Kohli)श्रीलंकामध्ये २२ वनडे सामन्यात ५१ च्या सरासरीने ८५६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये चार शतकाचा समावेश आहे. कर्णधार रोहित शऱ्माने श्रीलंकामध्ये २५ वनडे सामन्यात ९ च्या सरासरीने दोन शतकाच्या मदतीने ६१० धावा केल्या आहेत. केएल राहुलने सहा सामन्यात ६७ आणि शुभमन गिलने ४६ धावा केल्या आहेत.

कोलंबोत मियां मॅजिक चालणार -

श्रीलंकामध्ये भारतचा सर्वात यशस्वी गोलंदाज माजी फिरकीपटू हरभजनसिंह आहे. त्याने २२ वनडे सामन्यात २३ विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या वनडे संघामध्ये कुलदीप यादव सर्वात आघाडीवर आहे. कुलदीपने सहा सामन्यात नऊ विकेट घेतल्या आहेत. पण श्रीलंकामध्ये मोहम्मद सिराजचा बोलबाला आहे. टी२०मध्ये फक्त एक विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजने वनडेमध्ये दबदबा राखलाय. सिराजने दजोन वनडे सामन्या ३च्या इकॉनॉमीने सात विकेट घेतल्या आहेत. आशिया कप २०२३ मध्ये सिराजने भेदक मारा केला होता. सिराजने २१ धावा खर्च करत सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. श्रीलंकेत मियां मॅजिक चालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीलंकाविरोधात टीम इंडिया शतक ठोकणार -

श्रीलंकामध्ये टीम इंडियाचा दबदबा राहिलाय. आकड्यावरुन श्रीलंके विरोधात भारतीय संघाचे पारडे वरचढ दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत १६८ वनडे सामने झाले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाने ९९ वेळा विजय मिळवलाय. तर श्रीलंकेला ५७ वेळा विजय मिळवता आलाय. ११ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. आज रोहित ब्रिगेडनं विजय मिळवताच श्रीलंकाविरोधात भारतीय संघाचं विजयाचं शतक पूर्ण होार आहे.

श्रीलंकामध्ये काटें की टक्कर -

श्रीलंकेमध्ये दोन्ही संघामध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. आकड्यावरुन दोन्ही संघामध्ये तुल्यबळ सामना झाल्याचं दिसतेय. श्रीलंकेमध्ये दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ६६ वेळा सामने झाले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाने ३२ विजय मिळवले, तर श्रीलंकेला २८ विजय मिळाले आहेत. सहा सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

सामन्यावर पावसाचे सावट -

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट (IND vs SL 1st ODI Weather Report) आहे. स्थानिक हवामान विभागाने कोलंबोमध्ये (colombo weather) आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुपारी १२, सायंकाळी चार आणि रात्री सात ते दहा यादरम्यान पावसाची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत?

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल , ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

श्रीलंका : चरिथ असलांका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, जेनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षणा, असिथा फर्नांडो, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका, अकिला धनंजय आणि दुनिथ वेल्‍लागे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com