IND vs SL : रोहित-विराट सज्ज, पहिल्या वनडेवर पावसाचे सावट, पाहा काय सांगतो हवामानाचा अंदाज?

IND vs SL 1st ODI Pitch Report, Weather : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. कोलंबो येथे होणाऱ्या (colombo weather) या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
IND vs SL, ODI Series: रोहित-विराट वनडे मालिकेसाठी सज्ज
virat kohli with rohit sharma, IND vs SLsaam tv
Published On

तीन सामन्याच्या टी२० मालिकेमध्ये भारताने यजमान श्रीलंकेचा (IND vs SL) धुव्वा उडवला. आजपासून (२ ऑगस्ट) दोन्ही संघामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेला (IND vs SL ODI) सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट (IND vs SL 1st ODI Weather Report) आहे. स्थानिक हवामान विभागाने कोलंबोमध्ये (colombo weather) आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, त्याच्या पूर्वतयारीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणारी ही वनडे मालिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच भारतीय संघ या मालिकेत संपूर्ण ताकिदीने मैदानात उतरत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज आज खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेचा सूपडा साफ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याशिवाय केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचेही वनडेमध्ये कमबॅक झालेय. टी२० मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही एकतर्फी वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. पण कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता -

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन वाजता नाणेफेक होईल. एक्यूवेदरच्या रिपोर्ट्सनुसार, कोलंबोमध्ये सामन्यावेळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर होण्याची शक्यता आहे. कारण, दुपारी १२ वाजल्यापासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजताही पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. कोलंबोमध्ये आज ५१ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोलंबोमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पण पुन्हा संध्याकाळी सात ते दहा वाजेदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोलंबोमध्ये पावसाचा आज जोर जास्त असल्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा पहिला वनडे सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय पावसामुळे सामना प्रभावित झाला तर डकवर्थ लुईस नियंमाप्रमाणे सामना खेळवला जाऊ शकतो.

कोलंबोच्या मैदानात आतापर्यंत १५० सामने -

आर. प्रेमदासा स्टेडियमवर आतापर्यंत १५० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८० वेळा विजय मिळवलाय. तर धावांचा पाठलाग करताना ५९ वेळा विजय मिळवलाय. ९ सामने रद्द झाले आहेत. पहिल्या डावात या मैदानावर सरासरी २३० ते २४० धावा झाल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत?

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल , ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

श्रीलंका : चरिथ असलांका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, जेनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षणा, असिथा फर्नांडो, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका, अकिला धनंजय आणि दुनिथ वेल्‍लागे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com