Riyan Parag: पहिल्या वनडेसाठी रोहितचा मास्टरप्लान! IPL गाजवणारा हा स्टार खेळाडू करणार पदार्पण

India vs Sri Lanka 1st ODI: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात आयपीएल गाजवणाऱ्या स्टार खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.
Riyan Parag: पहिल्या वनडेसाठी रोहितचा मास्टरप्लान! IPL गाजवणारा हा स्टार खेळाडू करणार पदार्पण
team indiatwitter
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर स्टार भारतीय खेळाडू पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी-२० मालिका झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका हे दोन्ही पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात येणार आहेत.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Riyan Parag: पहिल्या वनडेसाठी रोहितचा मास्टरप्लान! IPL गाजवणारा हा स्टार खेळाडू करणार पदार्पण
IND vs SL,ODI Series: भारत-श्रीलंका मालिका सुरु होण्यापूर्वीच संघाला मोठा धक्का! संघातील 2 खेळाडू मालिकेतून बाहेर

रियान परागला संधी मिळणार

भारतीय संघात आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. रियान परागला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. टी-२० मालिकेसाठी निवड झालेल्या संघात रियान परागचा समावेश करण्यात आला होता. यासह वनडे मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्याला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Riyan Parag: पहिल्या वनडेसाठी रोहितचा मास्टरप्लान! IPL गाजवणारा हा स्टार खेळाडू करणार पदार्पण
Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकलं, इतिहास रचला! स्वप्नील कुसाळेला नेमबाजीत कांस्य; महाराष्ट्राची मान उंचावणारा VIDEO

कोणाच्या जागी मिळू शकते संधी?

वनडे मालिकेतील पहिला सामना २ ऑगस्ट रोजी कोलंबोत रंगणार आहे. कोलंबोची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे भारतीय संघात फिरकी गोलंदाजांचा समावेश पाहायला मिळू शकतो. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी रियान परागचा संघात समावेश केला जाऊ शकतो. रियान पराग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन फिरकी गोलंदाजीतही मोलांचं योगदान देऊ शकतो.

Riyan Parag: पहिल्या वनडेसाठी रोहितचा मास्टरप्लान! IPL गाजवणारा हा स्टार खेळाडू करणार पदार्पण
VIDEO: मराठमोळ्या Swapnil Kusale याची Paris Olympic मध्ये मोठी कामगिरी, Eknath Shinde यांच्याकडून कौतूक

आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी

आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान परागने शानदार कामगिरी केली होती. या हंगामात तो अनुशासनाने फलंदाजी करताना दिसून आला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून मधल्या फळीत खेळताना त्याने ५७३ धावा केल्या होत्या. ही त्याची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com