Swapnil Kusale Wins Bronze in Rifle Shooting: कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक मिळवून नवा इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. ऑलिंम्पिक स्पर्धेमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. या यशाने महाराष्ट्राची मान उंचावली असून देशभरातून स्वप्निलचे कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. पात्रतामध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या स्वप्नीलने ४५१.४ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे कांस्यपदक आहे. याआधी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले होते.
कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकावत नवा इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या यशानंतर स्वप्निलच्या कुटुंबियांसह देशवासियांनी त्याचे अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नेमबाजीत कांस्यपदक पटकावून अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या हिरोचा संघर्षही काही साधा नाही. स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. स्वतः स्वप्निलने रेल्वे विभागामध्ये टी. सी म्हणून काम केले आहे. महेंद्रसिंग धोनी हे त्याचे प्रेरणास्थान असल्याचे तो म्हणतो. स्वप्निलच्या या यशाचे क्रिडामंत्री रक्षा खडसे, पी. टी उषा, यांनी कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.