Nada Hafez : गरोदरपणातही तलवारबाजी करणारी हफीज! क्रीडा क्षेत्रातील त्या सुपरमॉम्स कोण? गरोदरपणातही खेळले सामने

paris olympics 2024 : ऑलिम्पिक स्पर्धेत गरोदरपणातही तलवारबाजी करणारी हफीज. क्रीडा क्षेत्रातील सुपरमॉम्सविषी जाऊन घेऊयात. त्यांनी गरोदरपणातही सामने खेळले आहे.
गरोदरपणातही तलवारबाजी करणारी हफीज! क्रीडा क्षेत्रातील त्या सुपरमॉम्स कोण? गरोदरपणातही खेळले सामने
Nada Hafez Saam tv
Published On

मुंबई : करिअरच्या शिखरावर असताना अनेक महिलांची गरोदरपणामुळे काही सोनेरी संधी हुकते. अशी अनेक उहाहरणे आपल्याला विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. ज्याचं कथन महिलांनी केले आहे. पण या सगळ्याला छेद देत ऑलिम्पिकमध्ये 7 महिन्याच्या गर्भवती ऍथलीटने सहभाग घेतला. इजिप्तची फेंसर अर्थात तलवारबाज नादा हफीज असं तिचं नाव! इतिहासात अशी अनेक उहाहरणे पाहायला मिळतात जिथे महिलांनी एक वेगळा आदर्श निर्माण करुन दिला आहे. क्रीडा क्षेत्रातील अशा सुपरमॉम्सवर आणि त्यांच्या कहाण्यांवर नजर टाकुयात...

नादा हफीजने ऑल्मिपिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिने गरोदर असल्याचे सांगितले. ती 7 महिन्यांची गर्भवती आहे आणि तरीही तिने यामध्ये सहभाग घेतला होता. एवढंच नाही तर वर्ल्ड कप 10 एलिझाबेथ टार्टकोवस्कीच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात विजय प्राप्त केला.

हायोंगविरुद्धच्या सामन्यातही हाफिजने शआनदार खेळी केली. तिने जाहीर केल्यानंतर मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ऐरवी गरोदरपणात बाईला सांभाळण्याचा किंवा अशा स्थितीत जास्त हालचाली न करता स्वत: ची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण, तरीही हफीजने तलवारजी केली आणि विजयसुद्धा मिळवला.

गरोदरपणातही तलवारबाजी करणारी हफीज! क्रीडा क्षेत्रातील त्या सुपरमॉम्स कोण? गरोदरपणातही खेळले सामने
Paris Olympics 2024: शूटिंगमधला एमएस धोनी! रेल्वेत टीसीची नोकरी ते ऑलिंपिक फायनल; वाचा स्वप्नील कुसळेचा प्रवास

हफीजने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. तिने त्यात म्हटलंय की, '' खेळाच्या मंचावर दोनजण दिसत होते मात्र, प्रत्यक्षात आम्ही तिघे होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि या जगात येणारे माझं बाळ! गर्भारपण हे एरवी तारेवरची कसरत असते. पण परंतु जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते कठीण असले तरी समाधानकारकही होते. हे ऑलिम्पिक वेगळं होतं. ऑलिम्पिक खेळायची ही तिसरी वेळ आहे पण, यावेळी साथ एका छोट्या ऑलिम्पियनची मिळाली आहे''. नादा हाफेजने अनेक महिलांना प्रेरित केले आहे. पण ती एकटी नाही.

1. सुमा शिरूर (2004) :

राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक आणि माजी ऑलिम्पियन सुमा शिरूर यांनी गरोदरपणात सामना खेळला आहे. सहा महिन्यांच्या गरोदरपणात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामना खेळला. 2004 च्या ऑलिम्पिक्समध्ये सुमा शिरुर यांनी अंतिम फेरी गाठली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये शिरुर यांनी विविध पदके कमावलेली आहे. क्रिडा क्षेत्रात देशाचे नाव त्यांनी उंचावले आहे. 2003 मध्ये सुमा यांना अर्जुन पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले होते.

2. अ‍ॅलिसिया मॉन्टॅनो (2014):

ॲलिसिया मॉन्टॅनो हिने गरोदरपणातच ' अमेरिकन ट्रॅक अॅण्ड फील्ड चॅम्पियनशिप'मध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे, या चॅम्पियनशिपमध्ये तिने 800 मीटर शर्यतीत रेस पूर्ण केली. तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती होती. गुलाबी जर्सी आणि डोक्यात पिवळं फुल माळून धावपटू अॅलिसियाने तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला. ती सहा वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलीये.

गरोदरपणातही तलवारबाजी करणारी हफीज! क्रीडा क्षेत्रातील त्या सुपरमॉम्स कोण? गरोदरपणातही खेळले सामने
Paris Olympics 2025, Day 6: मराठमोळा स्वप्नील गोल्डवर निशाणा साधणार? पाहा सहाव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

3. सेरेना विल्यम्स (2017) :

टेनिस चॅम्पियन सेरेना विल्यम्स तिची शेवटची ग्रँडस्लॅम मॅच खेळली तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर होती. महिला एकेरीत 23 वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयादरम्यान तिची मोठ्या मुलीला ही गोष्ट कशी सांगितली याविषयी भाष्य केलं होतं. सेरेना विल्यम्स ही आजवरच्या सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक आहे.

आधीची ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून ती नंबर एक पदावर पोहोचली होती. म्हणजे बाळंतपणासाठी तिने रजा घेतली तेव्हा ती अव्वल स्थानी होती. बाळंतपणानंतर 3 महिन्यांत तिने पुनरागमन केले आणि तीसुद्धा तितकीच प्रेरणादायी कथा आहे. ज्या दिवशी गर्भवती सेरेना विल्यम्स ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी इतिहासातील सर्वात वयोवृद्ध महिला ठरली.

आई होण्याची इच्छा असूनही महिला खेळाडूंना अनेकदा करिअरचा विचार करुन त्यांची इच्छा दूर ठेवावी लागते. काही महिला खेळाडूंना मातृत्व आणि खेळातील करिअर अशा दौघांपैकी एकाची निवड करण्याची वेळ उद्भवते. अशीही अनेक उहाहरणे आहेत जिथे बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच अनेक महिला खेळाडूंनी तितक्याच ताकदीने आपल्या क्षेत्रात पदापर्ण केले आहे. कोणताही निर्णय असो त्यामध्ये महिला खेळाडूला आणि अशा सुपरमॉम्सना त्यांचे निर्णय खुलेपणाने घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्याला खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com