पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील पाचवा दिवस हा बॅडमिंटनपटूंनी गाजवला. आज (३१ जुलै) भारताला पदक मिळवता आलं नाही मात्र खेळाडूंनी पुढील फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. १ ऑगस्ट हा दिवस भारतीय खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण स्वप्नील कुसळे ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात अंतिम फेरीतील सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यासह भारतीय हॉकी संघ बेल्झियमविरुद्ध आपला चौथा सामना खेळणार आहे. दरम्यान कसं असेल सहाव्या दिवसाचं वेळापत्रक? जाणून घ्या.
नेमबाजी
५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स
(पुरुषांची अंतिम फेरी)
स्वप्निल कुसळे
(दुपारी १ वा.)
५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स (महिलांची पात्रता फेरी)
सिफ्ट कौर सामरा, अंजूम मुदगिल
(दुपारी ३.३० वा.)
ॲथलेटिक्स
पुरुषांची २० किमी चालण्याची शर्यत
परमजीत सिंग, आकाशदीप सिंग, विकास सिंग
(सकाळी ११ वा.)
महिलांची २० किमी चालण्याची शर्यत
प्रियांका गोस्वामी
(दुपारी १२.५० वा.)
गोल्फ
पुरुषांची पहिली फेरी
गगनजीत भुल्लर, शुभांकर शर्मा
(दुपारी १२.३० वा.)
हॉकी
पुरुषांचा चौथा साखळी सामना
भारत वि. बेल्जियम
(दुपारी १.३० वा.)
बॉक्सिंग
महिला उपउपांत्यपूर्व फेरी (५० किलो)
निखत झरीन वि. वू यू
(दुपारी २.३० वा.)
तिरंदाजी
पुरुष एकेरी (राऊंड ऑफ ६४)
प्रवीण जाधव वि. काओ वेन्चाओ
(दुपारी २.३० वा.)
आगेकूच केल्यास राऊंड ऑफ ३२ फेरीतील लढत ३.३० वा.
टेबल टेनिस
महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी
श्रीजा अकुला वि. सून यिंगशा
(मध्यरात्री १२.३० वा.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.