गतविजेत्या इंग्लंडला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विजयाचा सूर गवसलेला नाही. स्टार खेळाडूंची भरमार असूनही इंग्लंडला गेल्या ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ ३३.२ षटकात १५६ धावांवर संपुष्टात आला.
श्रीलंकेने हे आव्हान २५.२ षटकात पूर्ण करत ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या आहेत. दरम्यान या विजयानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
सेमीफायनलमध्ये जाण्याचा विश्वास..
गतविजेत्या इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. या सामन्यानंतर,आमचा संघही सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो असा विश्वास कर्णधार कुसल मेंडिसने व्यक्त केला आहे. (Latest sports updates)
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की,'नेट रन रेटमध्ये सुधारणा होणं ही आमच्यासाठी समाधानकारक बाब आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली हीच कामगिरी आम्ही सातत्याने सुरू ठेवली. आज सर्वांनी खुप चांगली कामगिरी केली. आम्हाला अजुन ४ सामने खेळायचे आहेत. मला असा विश्वास आहे की, आम्ही जर एकजूट होऊन चांगली कामगिरी करत राहिलो तर आम्ही सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.
श्रीलंकेकडून हे खेळाडू चमकले..
या सामन्यात श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना लहिरू कुमाराने ७ षटकात ३५ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर मॅथ्यूज आणि रजिताने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. या सामन्यात श्रीलंकेचा डाव १५६ धावांवर आटोपला.
या धावांचा पाठलाग करताना पथुम निसंका आणि सदिरा समनविक्रमाने १३२ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह श्रीलंकेच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.