Jos Buttler Statement: इंग्लंडच्या पराभवानंतर कर्णधार जोस बटलर अक्षरश: रडला; म्हणाला,'प्रामाणिकपणे सांगतो..'

Srilanka vs England, World Cup: या सामन्यानंतर कर्णधार जोस बटलरने मोठं वक्तव्य केलं आहे.
Jos Buttler Statement
Jos Buttler Statementtwitter
Published On

Jos Buttler Statement:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंडचा सुपरफ्लॉप शो सुरुच आहे. या स्पर्धेत इंग्लंडला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बंगळुरुतील चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेने बलाढ्य इंग्लंडचा ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. स्टार फलंदाजांची भरमार असलेला इंग्लंडचा डाव या सामन्यात १५६ धावांवर संपुष्टाता आला.

या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मोठं वक्तव्य केलं आहे. या सामन्यानंतर तो म्हणाला की,' ही स्पर्धा आमच्यासाठी खुप निराशाजनक राहिली आहे. मी स्वत:शी निराश आहे. संघातील इतर खेळाडू देखील स्वत:शी नाराज आहेत. कारण आम्ही या स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकलो नाही. मी खेळाडूंच्या चुका सांगत नाहीये पण, हे स्पष्ट आहे की आम्ही आमचं सर्वोत्तम देण्यात कुठेतरी मागे पडलोय. संघाच्या खराब कामगिरीसाठी सध्या माझ्याकडे कोणतंही योग्य उत्तर नाही. संघाचा कर्णधार म्हणून तुमची अशी इच्छा असते की, चांगली कामगिरी करुन संघाला पुढे न्यावं. मात्र ही भूमिका बजावण्यात मी कमी पडलो.' (Latest sports updates)

Jos Buttler Statement
Adil Rashid Run Out: असं कोण आउट होतं? फलंदाजीतील हलगर्जीपणा आदिल राशिदला महागात पडला; पाहा Run Out चा व्हिडिओ

तसेच श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने असा विश्वास व्यक्त केला आहे की, आमचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मेंडिसने म्हटलं की, 'नेट रन रेटमध्ये सुधारणा होणं ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली हीच कामगिरी आम्ही सातत्याने सुरू ठेवली. आज सर्वांनी खुप चांगली कामगिरी केली. आम्हाला अजुन ४ सामने खेळायचे आहेत. मला असा विश्वास आहे की, आम्ही जर एकजूट होऊन चांगली कामगिरी करत राहिलो तर आम्ही सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.'

Jos Buttler Statement
Eden Gardens Stadium: वर्ल्डकप सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना! ईडन गार्डन्स स्टेडियमची भिंत कोसळली; नेमंक काय घडलं?

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना बेन स्टोक्सने ४३ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली.

या सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला आहे. या धावांचा पाठलाग करताना पथुम निसंकाने नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर सदिरा समरविक्रमाने नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com