वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २५ व्या सामन्यात श्रीलंका आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेने दमदार खेळ करत ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह श्रीलंकेला मोठा फायदा झाला आहे. या विजयानंतर श्रीलंकेला गुणतालिकेत मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. श्रीलंकेचा संघ सातव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
श्रीलंकेच्या विजयामुळे पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ ४ गुण असूनही नेट रनरेट कमी असल्याने सहाव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर बांगलादेश आणि इंग्लंडचंही मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
अफगाणिस्तानचा संघ सातव्या स्थानी, बांगलादेशचा संघ आठव्या स्थानी आणि इंग्लंडचा संघ नवव्या स्थानी आहे. गुणतालिकेत नेजरलँडचा संघ सर्वात शेवटी आहे.
असे आहेत टॉप ४ संघ..
गुणतालिकेत यजमान भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५ पैकी ५ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेला केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने देखील ५ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ८ गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर ५ पैकी ३ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ ६ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (Latest sports updates)
श्रीलंकेचा जोरदार विजय..
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली.
इंग्लंडचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला आहे. या धावांचा पाठलाग करताना पथुम निसंकाने नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर सदिरा समरविक्रमाने नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.