IPL 2025: IPL मधील विदेशी खेळाडूंचं टेन्शन वाढणार! BCCI लिलावापूर्वीच घेणार कठोर निर्णय

IPL 2025, BCCI Meeting For Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीय आणि आयपीएल फ्रेंचायझींमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे.
IPL 2025: IPL मधील विदेशी खेळाडूंचं टेन्शन वाढणार! BCCI लिलावापूर्वीच घेणार कठोर निर्णय
jay shahtwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने बीसीसीआयची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आयपीएल फ्रेंचायझींचाही समावेश असणार आहे.या बैठकीपूर्वी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, आयपीएल फ्रेंचायझींच्या मालकांनी त्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जे मोक्याच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतात. लवकरच बीसीसीआय याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

IPL 2025: IPL मधील विदेशी खेळाडूंचं टेन्शन वाढणार! BCCI लिलावापूर्वीच घेणार कठोर निर्णय
IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला शेवटचा T20 सामना, भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप

क्रिकबझने दिलेल्या वृ्त्तानुसार, अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि वानिंदू हसरंगासारख्या खेळाडूंनी ऐनवेळी स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. ऑक्शनमध्ये कमी पैसे मिळाल्याने हे खेळाडू स्पर्धेतून माघार घेतात, असं म्हटलं जात आहे. तर काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे आणि दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेत असतात. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढतं. हा गंभीर मुद्दा लक्षात घेऊन बीसीसीआय लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते.

IPL 2025: IPL मधील विदेशी खेळाडूंचं टेन्शन वाढणार! BCCI लिलावापूर्वीच घेणार कठोर निर्णय
Paris Olympics 2024: श्रीजा अकुलाने रचला इतिहास! ऑलिंपिक स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारी ठरली दुसरीच महिला खेळाडू

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की, बहुतांश खेळाडू मेगा ऑक्शन नव्हे, तर मिनी ऑक्शनमध्ये सहभाग घेण्यावर अधिक भर देत आहेत. कारण मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर मोठी बोली लागते. यापूर्वीही अनेकदा बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझींच्या बैठका झाल्या आहेत.

मात्र यावर काही तोडगा काढण्यात आलेला नाही. मात्र यावेळी बीसीसीआय या मुद्द्यावर तोडगा काढू शकते,असं म्हटलं जात आहे. या बैठकीत किती प्लेअर रिटेन करता येणार याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे ही बैठक आयपीएल २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com