Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट

RCB vs DC, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर अक्षर पटेलने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट
axar patel statement on turning point in royal challengers bengaluru in rcb vs dc match amd2000twitter

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने घरच्या मैदानावर खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ९ गडी बाद १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव १४० धावांवर आटोपला.

या सामन्यात रिषभ पंत नव्हता. गेल्या सामन्यात वेळेत षटकं पूर्ण न केल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्याच्याऐवजी अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान आल्यानंतर अक्षर पटेलने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

या सामन्यानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, ' जर पावरप्लेच्या षटकांमध्येच ४ फलंदाज बाद झाले तर नक्कीच संघर्ष करावा लागतो. या खेळपट्टीवर १६०-१७० धावा पुरेशा होत्या.या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर काही चेंडू वेगाने येत होते, तर काही चेंडू खूप संथ गतीने येत होते. ज्यावेळी संघातील प्रमुख फलंदाज धावबाद होऊन माघारी परततो आणि पावरप्लेमध्ये ४ फलंदाज बाद होऊन जातात, त्यावेळी संघाच्या अडचणीत वाढ होते.'

दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीदेखील दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. प्लेऑफमध्ये जाण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' इथून कुठलाही निकाल संभव आहे. मात्र आम्ही पुढचा विचार करत नाहीये.'

Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट
Virat Kohli Record: IPL मध्ये इतिहास घडणार! विराट असा रेकॉर्ड करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून रजत पाटीदारने ५२ आणि विल जॅक्सने ४१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ९ गडी बाद १८७ वर पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली, कारण दिल्लीचा डाव १४० धावांवर आटोपला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४७ धावांनी आपल्या नावावर केला.

Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट
CSK vs RR, IPL 2024: राजस्थानकडून रियान पराग एकटाच लढला! CSK ला जिंकण्यासाठी १४२ धावांची गरज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com