Virat Kohli Record: IPL मध्ये इतिहास घडणार! विराट असा रेकॉर्ड करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू

Virat Kohli 250th IPL Match: आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना विराट कोहलीसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
virat kohli creates history he will play 250th ipl game for royal challengers bengaluru in ipl amd2000
virat kohli creates history he will play 250th ipl game for royal challengers bengaluru in ipl amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. असा रेकॉर्ड आयपीएल स्पर्धेत कुठल्याच खेळाडूला करता आलेलं नाही.

हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करतोय. यादरम्यान त्याने इतर कुठल्याही संघाचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. त्याने काही वर्ष या संघाचं नेतृत्वही केलं आणि संघासाठी सर्वाधिक धावा देखील केल्या. त्याने २४९ सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ७८९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान ८ शतकं देखील झळकावले आहेत.

virat kohli creates history he will play 250th ipl game for royal challengers bengaluru in ipl amd2000
CSK vs RR, IPL 2024: चेन्नई - राजस्थान सामन्यावर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास काय होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खेळणार २५० वा सामना

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील २५० वा सामना असणार आहे. यासह तो आयपीएल स्पर्धेत कुठल्याही फ्रँचायझीसाठी २५० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच खेळाडूला करता आलेला नाही. त्यामुळेच विराट कोहलीसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळेच तो मोठी खेळी करुन हा ऐतिहासिक सामना आणखी खास बनवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

virat kohli creates history he will play 250th ipl game for royal challengers bengaluru in ipl amd2000
IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं

दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत...

प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो प्लेऑफच्या शर्यतीती टीकून राहिल, तर पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्रार्थन करावी लागेल की, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com