आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना करताना दिसून येणार आहे. १२ पैकी ६ सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर पुढील २ सामने जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
तर १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर चेन्नईला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कसं असेल हवामान? जाणून घ्या.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५ सामने जिंकता आले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाने १४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर गेल्या दोन्ही संघांमधील गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर राजस्थान रॉयल्सने ५ पैकी ४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
हा सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरते. सुरुवातीला या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. मात्र खेळ जसजसा पुढे जातो तशी खेळपट्टी स्लो होते. त्यामुळे फलंदाजी करणं थोडं कठीण होऊन जातं.
accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी चेन्नईतील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सामन्यावेळी ऊन असेल आणि ढगाळ वातावरण असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज ६ टक्के इतका असणार आहे. हा सामना रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. याचा चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.