IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं

KKR vs MI, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं
Kolkata knight riders enters in ipl 2024 playoffs know points table update amd2000twitter

मुंबई इंडियन्सला धूळ चारत कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. १६-१६ षटकांच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १३९ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स संचने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी ९ सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. सध्या हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

या सामन्यापूर्वी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत प्लेऑफ ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र आता गुजरातला मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सचा संघ हा प्लेऑफमधून बाहेर पडणारा तिसरा संघ बनला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं
IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पावसाने व्यत्यय आलेला हा सामना उशीर सुरू झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १३९ धावा करता आल्या.

IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं
Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

असे आहेत १० संघ

१) कोलकाता नाईट रायडर्स - १८ गुण

२) राजस्थान रॉयल्स - १६ गुण

३) सनरायझर्स हैदराबाद - १४ गुण

४) चेन्नई सुपर किंग्ज -१२ गुण

५) दिल्ली कॅपिटल्स - १२ गुण

६) लखनऊ सुपर जायंट्स - १२ गुण

७) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -१० गुण

८) गुजरात टायटन्स -१० गुण

९) मुंबई इंडियन्स -८ गुण

१०) पंजाब किंग्ज -८ गुण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com