मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा ६० वा सामना ईडन गार्डन्सवर झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण अखेरच्या सामन्यातही मुंबईला विजय गवसला नाही. या विजयासह केकेआरचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. केकेआरने मुंबईला पराभूत करत पॉईट्स टेबलमध्ये उलटफेर घडवला.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १६ षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली राहिली, परंतु सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईची मधली फळी मोठी खेळी करण्यात आणि डाव सावरण्यात अपयशी ठरली. या पराभवासह मुंबईचा संघ पॉईट्स टेबलमध्ये ९ व्या स्थानी राहिलाय.
ऐन सामन्याच्या सुरुवातीला वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे १६ षटकाचा सामना करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या संघाने ७ गडी गमावत १५७ धावा केल्या होत्या. केकेआरनं दिलेलं आव्हान मुंबईसाठी माफक वाटत होतं. एमआयची फलंदाजी सुरू होईपर्यंत हा सामना मुंबई जिंकेल असं वाटत होतं. परंतु केकेआरच्या संघाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सचा संघ गारद झाला. केकेआर इडन गार्डन्सवर ५ सामने जिंकलेत. दरम्यान मुंबईला पराभूत करत कोलकाताचा संघ पॉईट्स टेबलमध्ये १८ पाईंट्स घेत पहिल्या स्थानी विराजमान झालाय. केकेआरने १२ सामन्यांमध्ये ९ विजय मिळवलेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.