IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आयपीएलआधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिलिज करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स रिटेन्स करण्याच्या विचारात नाही. आयपीएल २०२४ आधी मुंबईने (MI) हार्दिक पांड्याला गुजरातकडून (GT) खरेदी करत कर्णधारपदाची माळ गळ्यात घातली होती. पण हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईने निराशाजनक कामगिरी केली, त्यामुळे मुंबई आता मोठा निर्णय घेण्याच्या तायरीत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना मुंबई इंडियन्स रिटेन करु शकते, आशाही बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान, आयपीएलच्या मेगा लिलावाआधी प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्याबाबात प्रत्येक संघाने आता तयारी सुरु केली आहे.
आयपीएलच्या नियमांनुसार, प्रत्येक तीन वर्षानंतर मेगा लिलावाचं आयोजन करण्यात येत. यंदाचा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. सर्व दहा संघांना चार खेळाडू रिटेन करण्याची मुबा असेल. रिपोर्ट्सनुसार, यंदा रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, यंदा संघांना पाच खेळाडू रिटेन करता येतील, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स कोणत्याही परिस्थितीमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आशा परिस्थितीमध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला रिलिज करु शकते. कारण, सूर्यकुमार यादव सध्या टीन इंडियाचा कर्णधार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सही हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरुन हाकलून सूर्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याशिवाय, रोहित शर्माही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्व खेळण्यास तयार असेल.
रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदा हार्दिक पांड्या मुंबई खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा संघ बांधणी करण्यासाठी तयारी करत असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.