MPSC Recruitment
MPSC RecruitmentSaam Tv

MPSC Recruitment : MPSC अंतर्गत सर्वात मोठी भरती, विविध पदांच्या ४८० रिक्त जागा; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

MPSC Group B Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीमध्ये गट ब पदांसाठी ही भरती आहे. ४८० रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.
Published on

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा खूप अवघड असते. या परीक्षेत पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही एमपीएससी परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक पोलिस उपनिरिक्षक दुय्यम निबंधक/ मुंद्राक निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एमपीएससीअंतर्गत ४८० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (MPSC Recruitment)

MPSC Recruitment
Coast Guard Jobs: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, तटरक्षक दलात भरती; अर्ज कुठे कराल? जाणून घ्या सविस्तर

एमपीएससी गट ब या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १४ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे.

एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही खूप चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र ठरतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (MPSC Group B Recruitment)

MPSC Recruitment
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती सुरु; मिळणार १६०००० रुपये पगार

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना नीट वाचावी.

MPSC Recruitment
Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com