Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती सुरु; मिळणार १६०००० रुपये पगार

Indian Oil Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइलमध्ये सध्या लॉ ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Indian Oil Job
Indian Oil JobSaam Tv
Published On

इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची चांगली संधी आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ज्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएट डिग्री किंवा लॉमध्ये ग्रॅज्युएट डिग्री असणे गरजेचे आहे. याचसोबत ५ वर्षांच्या LLB डिग्री असायला हवी. इंडियन ऑइलच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ होती. ही तारीख आता वाढवून १८ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. (Indian Oil Job)

Indian Oil Job
IRCTC Job: रेल्वेमध्ये नोकरी अन् महिना २ लाख पगार, IRCTC मध्ये निघाली भरती; जाणून घ्या सर्वकाही

लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. या नोकरीसाठी १२ जागा रिक्त आहे.IOCL भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड CLAT 2024 स्कोर, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लॉ ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तुम्ही आवश्यक कागदपत्रे सबमिट करुन फॉर्म भरु शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Oil Recruitment)

Indian Oil Job
BMC Jobs: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळणार ९२००० पगाराची नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा?

सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्येही नोकरीची चांगली संधी आहे. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. बी कॉम ते हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करु शकतात. टिआरएफच्या अधिकृत वेबसाइवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Indian Oil Job
तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत तब्बल १ लाख पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com