BMC Jobs: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळणार ९२००० पगाराची नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा?

BMC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. ग्रुप सी इन्स्पेक्टर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
BMC Jobs
BMC JobsSaam Tv
Published On

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कारनिर्धारण व संकलन खात्यात नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत निरीक्षक गट क म्हणजेच ग्रुप सी इन्स्पेक्टर पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

BMC Jobs
ONGC Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ONGC मध्ये तब्बल २२३६ पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर

बृहन्मुंबई महानगरपालिकेने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १७८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २९,००० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे.(BMC Job)

BMC Jobs
Government Job: डिप्लोमा झालाय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठीही भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात जवळपास दोन महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवार ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. १०वी पास आणि पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (BMC Recruitment)

BMC Jobs
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल १८४६ जागांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com