सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओएनजीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये २२३६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी आहे. ओएनजीसीसारख्या मोठ्या कंपनीत तुम्हाला अप्रेंटिसशिपची संधी मिळत आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करा. (Government Job)
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने अर्ज NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी १०वी/१२वी / ITI/ डिप्लोमा / बीएससी / बीई / बीटेक / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. ()
या अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (ONG Apprentice Recruitment)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.