Railway Jobs: तब्बल १४२९८ जागांसाठी रेल्वेत मेगाभरती; दहावी पास उमेदवारही करु शकतील अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ हजारांपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Railway Jobs
Railway JobsSaam Tv
Published On

रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने टेक्निशियन पदासाठी अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. टेक्निशियन भरती मोहिमेद्वारे १४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नाही ते उमेदवार १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज ककु शकतात.

याआधी रेल्वे टेक्निशियन ग्रेड I सिंगल आणि टेक्निकल ग्रेड III भरतीसाठी अर्जप्रक्रिया ९ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत ओपन होती. यामध्ये ९१४४ पदे भरती केली जाणार होती. मात्र, सध्या टेक्निशियन पदासाठी अधिक गरज भासत आहे. त्यामुळे आता १४२९८ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Railway Jobs
Government Job: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पण कुठे? वाचा सविस्तर

रेल्वे भरती बोर्डाने अॅप्लीकेशन विंडो ओपन करुन तरुणांना सरकारी नोकरी मिळवून देण्याची संधी दिली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

टेक्निशियन ग्रेड I सिग्नलसाठी १०९२ पदे रिक्त आहेत.टेक्निशियन ग्रेड ३ ओपन लाइनसाठी ८०५१ पद रिक्त आहेत. टेक्निशियन ग्रेड ३ वर्कशॉप अँड PUsसाठी १४२९८ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी टेक्निशियन ग्रेड I सिग्नल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत बीएससी किंवा बीई / बी.टेक किंवा ३ वर्षांचा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक डिप्लोमा केलेला असावा. (Railway Recruitment)

Railway Jobs
Kokan Railway Job: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; महिना ६८००० रुपये पगार; पात्रता जाणून घ्या

टेक्नीशियन ग्रेड ३ ओपन लाइन आणि टेक्नीशियन वर्कशॉप अँड PUs पदासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत एनसीवीटी किंवा आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त असावी. या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. पदानुसार वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला फी भरावी लागणार आहे. (Railway Job)

Railway Jobs
Bank Jobs 2024 : अखेरची संधी, आजच करा अर्ज; SBI मध्ये १५११ पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com