Bank Jobs 2024 : अखेरची संधी, आजच करा अर्ज; SBI मध्ये १५११ पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या डिटेल्स

SBI Recuitment 2024 : SBI बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
State Bank Of India Recruitment
State Bank Of India RecruitmentSaam Tv
Published On

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तुम्हीही धडपड करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ४ ऑक्टोबरपर्यंतच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. अशात आता तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर वेळ निघून गेलेली नाही. संध्याकाळपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

State Bank Of India Recruitment
TMC Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) प्रोजेक्ट मॅनेजनेंट आणि डिलिवरीचे १८७ पदे आहेत. तर डेप्युटी मॅनेजर इंफ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन या पोस्टसाठी ४१२ पदे शिल्लक आहेत. दोन्ही मिळून एकूण १५११ जागांसाठी एसबीआयची ही मोठी भरती आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://sbi.co.in/web/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

शिक्षणाची अट काय?

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी शिक्षणाची अट देखील तपासावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील B.Tech, BE आणि MCA ही पदवी असली पाहिजे. तसेच M.Tech आणि M.Sc पदवी आणि या कामाचा २ ते ४ वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

वयाची अट काय?

डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला वयाची अट - २५ ते ३५ वर्षे इतकी देण्यात आली आहे.

तसेच सहाय्यक व्यवस्थापक पादासाठी २१ ते ३० वर्षे अशी वयाची अट आहे.

फॉर्म शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सामान्य/EWS आणि OBC यांना ७५० रुपये फी आहे. तर SC/ST आणि PWBD यांना मोफत अर्ज करता येणार आहे.

State Bank Of India Recruitment
TMC Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com