ITI Institutes Renaming: ब्रेकिंग! राज्यातील १४ आयटीआय संस्थांची नाव बदलली; कोणत्या कॉलेजला कुठले नाव? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra ITI Institutes Renaming: राज्यातील १४ सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नामांतराचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे.
ITI Institutes Renaming: मोठी बातमी! राज्यातील १४ ITI संस्थांचे नाव बदललं; पाहा संपूर्ण यादी
Managl Prabhat LodhaSaam TV
Published On

गणेश कवाडे| मुंबई, ता. २३ सप्टेंबर

Renaming of 14 ITI Institutes In Maharashtra: राज्यातील १४ सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नामांतराचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची मोठी घोषणा केली असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आला आहे. ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, बीड, अहमदनगर, नाशिक, पालघर, वर्धा जिल्ह्यांमधील आयटीआय संस्थांची नावे बदलण्यात आली आहेत.

ITI Institutes Renaming: मोठी बातमी! राज्यातील १४ ITI संस्थांचे नाव बदललं; पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत मोठी फूट पडणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार?

कुठल्या आयटीआयला कुणाचे नाव?

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे

नवे नाव: धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे.

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई

नवे नाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर.

नवे नाव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर.

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि. बीड

नवे नाव: कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि.बीड.

ITI Institutes Renaming: मोठी बातमी! राज्यातील १४ ITI संस्थांचे नाव बदललं; पाहा संपूर्ण यादी
Amravati Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली; थरारक VIDEO

५. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर

नवे नाव: भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर.

६. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक.

नवे नाव: महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक.

७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.

नवे नाव: राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.

८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

नवे नाव: संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली:

नवे नाव: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली

ITI Institutes Renaming: मोठी बातमी! राज्यातील १४ ITI संस्थांचे नाव बदललं; पाहा संपूर्ण यादी
Sangli Crime: धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील ४०० किलो तांदळाची चोरी; जत तालुक्यातील घटना

१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

नवे नाव: कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव.

११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

नवे नाव: दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई

नवे नाव: दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

नवे नाव: महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई.

१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव

नवे नाव: आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

ITI Institutes Renaming: मोठी बातमी! राज्यातील १४ ITI संस्थांचे नाव बदललं; पाहा संपूर्ण यादी
Laxman Hake News: 'मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला छत्रपती मानत नाही, राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंची टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com