Amravati Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली; थरारक VIDEO

Amravati Bus Accident News : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-धारणी मार्गावर सोमवारी (ता. २३) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली.
Amravati Private Bus Accident News
Amravati Private Bus Accident NewsSaam TV
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Private Bus Accident News : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-धारणी मार्गावर सोमवारी (ता. २३) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस थेट दरीत कोसळली. या घटनेत तब्बल 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.

Amravati Private Bus Accident News
Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार; भरधाव ट्रकने ५ ते ६ वाहनांना उडवलं

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस परतवाडा (Amravati) येथून दररोज सकाळी धारणीच्या दिशेने जाते. या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात. सोमवारी सकाळी देखील बस परतवाडा येथून धारणीच्या दिशेने निघाली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बस सेमाडोह परिसरात आली असता, एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

काही क्षणार्धात बस पूलाच्या खाली खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर बसमधील (Bus Accident) प्रवाशांनी मोठी आरडाओरड सुरू केली. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या अपघातात जवळपास ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी सेमाडोह येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बसला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढलं जाणार आहे. याप्रकरणी सध्यातरी कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

बुलढाण्यात ट्रॅक्टर पलटी होऊन तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पूनई गावात रविवारी ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॉलीमधील सिमेंटचे पोल अंगावर पडल्याने तीन मजुराचां दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. महावितरणच्या विद्यूत लाईनचे कामासाठी लागणारे इलेक्ट्रिक पोल ट्रॅक्टरमधून नेले जात होते. सर्व मृतक हे खामगाव जवळील वाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Amravati Private Bus Accident News
Monsoon Return Rain : आजपासून परतीचा पाऊस सुरु होणार; मराठवाडा-विदर्भाला झोडपून काढणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com