Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार; भरधाव ट्रकने ५ ते ६ वाहनांना उडवलं

Nashik Accident News : नाशिक शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या ट्रकने तब्बल ५ ते ६ वाहनांना जोरदार धडक दिली.
Nashik Truck Accident News
Nashik Truck Accident NewsSaam TV
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

Nashik Truck Accident News : नाशिक शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या ट्रकने तब्बल ५ ते ६ वाहनांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की सर्व वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Nashik Truck Accident News
Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. वाहनचालक मद्यपान करून गाड्या चालवत असल्याने मोठमोठे अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचा जीव गेला असून अशा चालकांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी याकडे लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.

अगदी आठवडाभरापूर्वी नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला होता. विदेशी महिलेने सुसाट रिक्षा चालवत एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर विदेशी पर्यटकांनी पळ काढला होता. या घटनेनं नारायणगाव येथे मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच पुन्हा नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली.रविवारी रात्री शहरातील तारवाला सिग्नल चौकात सुसाट वेगात असलेल्या ट्रकने ५-६ वाहनांना दिली धडक अपघात इतका भीषण होता, की मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे धावत आले.

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Nashik Truck Accident News
Andheri Fire : मुंबईतील अंधेरीत इमारतीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com