Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Prohibition Order Issued in Nashik City : नाशिक शहरात आजपासून मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे, ते आपण जाणून घेवू या.
नाशिक शहरात आजपासून मनाई आदेश
Prohibition Order Issued in Nashik City Saam Tv
Published On

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू झाले आहेत. २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू आहेत. आजपासून १५ दिवस नाशिक शहरात पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. नेमकं हे आदेश का देण्यात आले आहेत? यामागे काय कारण आहे, हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू (Nashik News) नये, यासाठी प्रशासनाने २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण उत्सवामध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले असल्याचं समोर आलंय.

नाशिक शहरात मनाई आदेश लागू

आगामी सण-उत्सव, आरक्षणाचा मुद्दा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ (Prohibition Order Issued in Nashik City) नये, यासाठी निर्णय घेण्यात आलाय. मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा निदर्शनं करता येणार नाही.

नाशिक शहरात आजपासून मनाई आदेश
Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

मनाई आदेश देण्यामागे काय कारण?

२१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत दरम्यान स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई आहे. मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, (Prohibition Order in Nashik) घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. विना परवानगी मोर्चे, (Prohibition Order) आंदोलनांना मनाई देखील या १५ दिवसांमध्ये करण्यात आलीय.

नाशिक शहरात आजपासून मनाई आदेश
Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com